Wardha Crime : वर्धा पोलिसांचा मोठा दणका! 'वॉशआऊट' मोहिमेत १.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त

Wardha Crime : वर्धा पोलिसांचा मोठा दणका! 'वॉशआऊट' मोहिमेत १.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

वर्धा : जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या मुळावर घाव घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने 'वॉशआऊट' मोहीम राबविली. या धडक कारवाईत पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे १ कोटी ६६ लाख रुपयांचा दारूसाठा आणि साहित्य जप्त करून नष्ट केले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

एकाच वेळी छापेमारी; १०४ गुन्हे दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गावठी दारूभट्ट्यांच्या ठिकाणांवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. या मोहिमेत १०४ गुन्हे दाखल झाले असून १०९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार 'ई-साक्ष' ॲप्लिकेशनचा प्रभावी वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.

३७७ पोलिसांची फौज मैदानात

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध शाखांचे एकूण ३७७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. १९ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वेगवेगळ्या पथकांनी ही 'सर्जिकल स्ट्राईक' सारखी कारवाई पूर्ण केली.

"वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक कारवाया यापुढेही सुरूच राहतील."

— सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा.

कारवाईचा परिणाम

अचानक झालेल्या या 'वॉशआऊट' मोहिमेमुळे दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. वर्धा पोलिसांनी दाखवलेल्या या 'ॲक्शन मोड'मुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news