पत्‍नीच्या दशक्रियेचा स्वयंपाक करतांना सिलेंडरचा स्फोट, संसारोपयोगी साहित्‍य जळून खाक file photo
बीड

पत्‍नीच्या निधनानंतर दशक्रिया विधीचा स्वयंपाक करतांना सिलेंडरचा स्फोट, दोन घरे जळून खाक

परिसरात मोठी खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

Cylinder explodes while cooking for wife's Dashakriya, household items burnt to ashes

अंबाजोगाई : गोविंद खरटमोल

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या आगीत दोन घरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पट्टीवडगाव येथील रहिवासी बालासाहेब जाधव यांच्या पत्नी पार्वतीबाई जाधव यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. आज त्यांच्या निधनानंतरचा दहाव्याचा कार्यक्रम करण्यात येत होता. या कार्यक्रमासाठीच सकाळपासून स्वयंपाकाची लगबग सुरू होती. स्वयंपाक सूर असतानाच सकाळी ९:३० च्या सुमारास गॅस भट्ट्याने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच भट्ट्याला जोडलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता की, ज्या माळवदाच्या घरात स्वयंपाक सुरू होता त्या घराला तात्काळ आगीने वेढले. घराला लाकडी माळवद व बांधकाम असल्याने आगीचा भडका उडाला आणि ही आग शेजारील दुसऱ्या घरापर्यंत पसरली. या भीषण आगीत दोन्ही घरातील धान्य, कपडे, भांडी आणि इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे.

सकाळच्या वेळी झालेल्या या मोठ्या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र जाधव कुटुंबाचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे.

पत्नीच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच या आगीत राहते घर आणि संसार देखील उघड्यावर पडल्याने बालासाहेब जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महसूल प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT