Beed Accident | मोटरसायकलने हूल दिल्याने कार पाचवेळा पलटली; भीषण अपघातात पतीसह गर्भवती पत्नी जखमी..

गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनक, आष्टी तालुक्यातील बावी येथे भीषण अपघात
Beed Accident
Beed Accident
Published on
Updated on

कडा :- आष्टी तालुक्यातील बावी येथे आज एक भीषण अपघात घडला असून, पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहिती नुसार,पाटोदा तालुक्यातील मारुतीची पांगरी येथे सासर वाडीच्या यात्रेसाठी संतोष गोल्हार हे आपल्या कारने (Mh १२ FF ३७९५) त्यांच्या पत्नीसह गेले होते.यात्रे वरून परत येत असताना मोटर सायकलने हूल दिल्यामुळे गाडीचा ताबा सुटल्याने गाडी पाच पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी हाजीपूर येथील संतोष गोल्हार व त्यांची पत्नी जखमी झाले आहेत. संबंधित महिला गर्भवती असल्याने तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनक

अपघाताची भीषणता इतकी होती की कार रस्त्याच्या कडेला जाऊन पाचवेळा उलटली. या अपघातात संतोष गोल्हार यांच्या पत्नी,ज्या गरोदर आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तीव्र वेदना होत असल्याने तातडीने आष्टी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते समीर शेख व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी तातडीने जखमींना बावी येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना आष्टीला हलवण्यात आले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

कापशीजवळ माय-लेकराच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज दुसरा अपघात झाला बीड– कल्याण राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, हा मार्ग आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. कापशी जवळ नुकत्याच घडलेल्या माय-लेकराच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची वेदना अजूनही ताजी असतानाच आज पुन्हा एक भीषण अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news