बीड, पुढारी वृत्तसेवा: गोरक्षनाथ टेकडीला या परिसरात वेगळे महत्त्व असून नाथपंथीयांचे कार्य समाज उपयोगी आहे, त्यामुळे या टेकडीला मानणारा वर्ग मोठा असून जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत नाथांची कीर्ती आजरामर राहील असे गौरव उद्दार पाचपोर महाराज यांनी काढले. दरम्यान शनिवारी गोरक्षनाथ टेकडी येथे किसान बाबा यांची पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी सांगता झाली. या सांगता समारंभात लाखोंचा जनसागर उसळला होता.
विसाव्या शतकातील महान सदूरू संत किसन बाबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व गुरुवर्य किसन बाबा महाराज यांची २७ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी पहाटे गुरुवर्य किसन बाबा महाराज यांच्या समाधीची विधिवत गुरू पूजन महंत गुरुवर्य शांतीब्रह श्री नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
सकाळी १२ वाजता प्रतिवर्षी प्रमाणे संजय महाराज पाचपोर यांचे काल्याच्या कीर्तनाने झाली. या कीर्तनसाथ नानाभाऊ लांडे महाराज, व लक्ष्मीकांत म कदम मृदंगसाथ धनंजय महाराज बोंगाने, अनिकेत महाराज लांडे यांची कीर्तनात मृदंग साथ दिली. अभंग विवेचन करताना पाचपोर महाराज यांनी सांगितले की नाथांनी आपल आयुष्य गोर गरिबांच्या हितासाठी अर्पण केले. गोर गरिबांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत म्हणून नाथांनी आयुष्य घातले आदिनाथ, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, साधू महाराज, गुरुवर्य किसनबाबा महाराज, शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांनी आपल आयुष्य जनसामान्य माणसासाठी घातले.
म्हणून जो पर्यंत या पृथ्वीवर चंद्र सूर्य आहे तो पर्यंत नाथांची किर्ती अजरामर होत हा नाथाचा लोककल्याणाचा वारसा गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज हे चालवत आहेत असे प्रतिपादन पाचपोर महाराज यांनी केले. जयदत्त क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे सह भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी मध्ये गुरुवर्य किसन बाबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता झाली.