मला बदनाम करण्यासाठी मोठे नेते प्रयत्न करत होते : आ. धनंजय मुंडे (File Photo)
बीड

मला बदनाम करण्यासाठी मोठे नेते प्रयत्न करत होते : आ. धनंजय मुंडे

एव्हढे मोठे नेते आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करताहेत म्हणजे आपल्यातही काही तरी आहे. तशा स्थितीत परळीतील जनतेने महायुतीला भरघोस आशीर्वाद दिले, असे प्रतिपादन आ. धनंजय मुंडे यांनी केले.

पुढारी वृत्तसेवा

Big leaders were trying to defame me: MLA Munde

परळी, पुढारी वृत्तसेवा सगळेजण नगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात होते, मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. मला बदनाम करण्यासाठी मोठमोठे नेते प्रयत्न करत होते. पण मलाही लक्षात आले की, एव्हढे मोठे नेते आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करताहेत म्हणजे आपल्यातही काही तरी आहे. तशा स्थितीत परळीतील जनतेने महायुतीला भरघोस आशीर्वाद दिले, असे प्रतिपादन आ. धनंजय मुंडे यांनी केले.

परळी येथे आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.१९) वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना आ. मुंडे यांनी नगरपालिका निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, मला राजकीयदृष्ट्या संपवायला राज्यातील मोठमोठे नेते प्रयत्न करत होते. अगदी सोशल मीडियातूनही माझ्यावर आरोप केले जात होते.

त्यावेळी माझ्या लक्षात आले की, एव्हढेजण प्रयत्न करताहेत म्हणजे आपल्यातही काही तरी आहे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढलो आणि परळीकरांनी भरघोस आशीर्वाद दिले. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार सोळा हजारांनी निवडून आला.

अनेक नगर-सेवक निवडून आले, पण यातील अनेकांना ते कसे निवडून आले हेच माहीत नाही, ते मला माहिती आहे. पण आता जनतेने दिलेली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे असेही आ. मुंडे यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT