दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी  (Pudhari Photo)
बीड

Beed Vaijnath Bank election | वैद्यनाथ बँक निवडणूक: चार जागा बिनविरोध

सर्वसाधारण मतदारसंघ आणि भटक्या विमुक्त जा.ज. मतदारसंघासाठी होणार निवडणूक

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : मराठवाड्यातील अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेची निवडणूक बिनविरोध होईल असे शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असताना आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर वैद्यनाथ बँकेची निवडणूकच लागली आहे.

एकूण 17 जागांसाठीच्या या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघातील चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. मात्र प्रतिष्ठेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील बारा जागेसाठी 14 अर्ज कायम राहिले. त्यामुळे या मतदारसंघासाठी निवडणूक अटळ आहे तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या मतदारसंघातून निवडावयाच्या एका जागेसाठी दोन अर्ज कायम राहिल्याने या प्रवर्गासाठी निवडणूक अटळ झाली आहे.

महिला प्रवर्गासाठीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असुन यामध्ये माजी खासदार व विद्यमान संचालक डॉ. प्रीतम मुंडे आणि सौ. माधुरी योगेश मेनकुदळे यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेवर प्रा. विनोद जगतकर यांची बिनविरोध निवड झाली. तर इतर मागासवर्गीय मतदार संघातील एका जागेसाठी अनिल दिगंबरराव तांदळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकंदरीत आता सर्वसाधारण मतदारसंघासाठीच्या 12 जागेसाठी 14 अर्ज तर भटक्या विमुक्त जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेसाठी दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. या दोन मतदारसंघातील एकूण 13 जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 10 ऑगस्ट रोजी या निवडणुकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र

सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागेसाठी 14 उमेदवार

1.लाहोटी संदीप सत्यनारायण

2.जोशी प्रकाश रंगनाथराव

3.देशपांडे प्रविण भाउसाहेब

4.निर्मळे महेश्वर शिवशंकर

5.लोमटे सुशांत शरदराव

6.वाकेकर विजय सुवालाल

7.कलंत्री मनमोहन चंदुलालजी

8.डुबे अमोल विकासराव

9.जैन कुलभूषण शांतिलालजी

10.सामत विनोद अशोक

11.शिंदे बाबासाहेब शंकर

12.धमपलवार वैजनाथ नागनाथ

13.लोमटे राजेंद्र भगवानराव

14.मुंडे राजाराम लक्ष्मण

भटक्या विमुक्त जा.ज. मतदारसंघातील एका जागेसाठी दोन अर्ज

1. फड राजाभाऊ श्रीराम

2.कराड रमेश शेषेराव

महिला प्रतिनिधी : दोनही जागा बिनविरोध

1.मुंडे प्रितम गोपीनाथराव

2.मेनकुदळे माधुरी योगेश

इतर मागासवर्गीय एक जागा बिनविरोध: तांदळे अनिल दिगंबर

अनुसुचित जाती एक जागा बिनविरोध: जगतकर विनोद गणपतराव

एकूण बिनविरोध जागा : 4

निवडणूक होणार या जागांसाठी

12 जागा- सर्वसाधारण : 14 उमेदवार

1 जागा- भटक्या विमुक्त जा.ज.:2उमेद्वार

एकूण 13 जागेसाठी होणार निवडणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT