Beed Salegaon car motorcycle accident 
बीड

Beed Salegaon car motorcycle accident-साळेगावात मद्यधुंद कारचालकाने मोटरसायकलला दिली धडक, तरुण गंभीर जखमी

Beed | साळेगाव येथे कार व मोटरसायकचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

केज : केज तालुक्यातील साळेगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील चालकाने त्याची कार क्र. (एम एच ११/ बी एच ९३८२) भरधाव वेगात वाहन चालवले.

धाराशिव जिल्ह्यातील मोटार सायकलस्वार अमित नरसिंगे (रा. जायफळ ता. कळंब, जिल्हा धाराशिव) यांच्या मोटरसायकल क्र. (एम एच १२/जे एक्स ३२९०)म ला जोराची धडक दिली. या अपघाता अमित नरसिंगे हा गंभीर जखमी झालेला आहे.

दरम्यान, अपघातानंतर कारचालक हा त्याच्या ताब्यात असलेल्या वाहनासह पळून जात असताना त्याला साळेगाव येथील माजी उपसरपंच अमर मुळे, सामाजिक कार्यकर्ते जोगदंड आणि लक्ष्मण लांडगे यांनी पाठलाग करून पकडले. याची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना मिळताच त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल बाबजी दराडे यांना अपघातस्थळी रवाना केले.

अमर मुळे आणि लक्ष्मण लांडगे यांनी जखमी अमित नरसिंगे याला उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी घेऊन आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT