Beed  Pudhari photo
बीड

Beed | भोंदू खरातला भर चौकात गोळ्या घाला

लक्ष्मण महाराज पाटील यांचे प्रतिपादन; कासारी येथे अखंड हरिनाम सप्ताह

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : जिथे संतांची भूमी आहे, तिथे राजकीय नेतृत्वाने सोयी-सुविधा पुरवल्या तर त्यांना कधीही धोका निर्माण होणार नाही, असे परखड मत आळंदी येथील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील यांनी व्यक्त केले.

आष्टी तालुक्यातील कासारी येथे संत शिवस्वरूप वन महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेची बुधवारी (दि. १५) काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना पाटील महाराज बोलत होते. वारकरी संप्रदाय मानवी जीवनाला दिशा देणारा आणि चांगुलपणाची शिकवण देणारा असल्याचे सांगत त्यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

इस्कॉनसारख्या संप्रदायाने अल्पावधीत जागतिक स्तरावर प्रगती केली आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा हजारो वर्षांची असून, त्यालाही आता अधिक व्यापक पातळीवर प्रगती साधण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या तथाकथित भोंद बाबांच्या प्रकरणावर बोलताना पाटील महार- ाजांनी तीव्र संताप व्यक्त केला.

समाजातील अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर कडाडून टीका करत त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत भूमिका मांडली. अशा भोंदू प्रवृत्ती समाजाला घातक आहेत. अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली. पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यादरम्यान त्यांनी अत्यंत टोकाची प्रतिक्रिया देत केलेल्या विधानामुळे परिसरात चर्चाना उधाण आले आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या वाढत्या घटनांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत कायद्याचा धाक आणि कठोर शिक्षा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या सप्ताहात आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सांगता सोहळ्यासाठी आष्टी शहरासह तालुक्यातील विविध भागांतून हजारो भाविक उपस्थित होते. यामध नागरिक, महिला, भजनी मंडळ, मृदंगाचा व गायकांचा मोठा सहभाग होता. डी अण्णासाहेब चौधरी, सतीश शिंदे, श्याम अस, अमोलराजे तरटे, शांतीलाल भोसले, क पोकळे, उत्तम बोडखे, शालन मुळे, डिक्ला लोखंडे, मोहन घुले, दत्ताभाऊ सायकड, मनोज धनवडे, सचिन वारंगुळे, कपिल अग्रवाल, शरद रेडेकर, शरद गर्जे, ह.भ.प. संतोष महाराज मोरे, श्रीहरी पुरी महाराज, तावरे महाराज, ज्ञानदेव जगताप महाराज आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT