Beed crime | अंधार अन् 30 फूट खोल विहिरीत जीव धोक्यात घालून पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

एका दोराच्या साहायाने त्यांनी अनिता पवार या महिलेला गावकऱ्यांच्या मदतीने वर काढण्यात आले
Beed crime | अंधार अन् 30 फूट खोल विहिरीत जीव धोक्यात घालून पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : घटना घडून गेल्यानंतर पोलिस तेथे पोहोचतात अशी चित्रपटाने पोलिसांची प्रतिमा मलिन केली आहे. परतु केज तालुक्यात प्रचंड अंधार आणि तीस फूट खोल असलेल्या विहिरीतून पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या महिलेचे प्राण वाचविले आहेत.

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांगवडगाव (ता. केज) येथील अनिता पवार ही पारधी समाजातील महिला हिचे तिच्या पती सोबत भांडण झाले होते. पती-पत्नीच्या झालेल्या किरकोळ वादातून अनिता पवार हिने मांगवडगाव शिवारातील तीस फूट खोल असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना मळाली. तत्काळ त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे आणि त्यांच्या सोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गायकवाड, स्वप्निल शिनगारे, सिद्धेश्वर शिंदे करवले व यादव हे घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळ स्थळी पोहोचताच पोलिसांनी विहिरीचा अंदाज घेतला असता ती विहीर ३० खोल होती. अंधार असल्याने पाण्याचा अंदाज येत नव्हता, परंतु त्या महिलेला जिवंत बाहेर काढण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल शिनगारे हे त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत उतरले. एका दोराच्या साहायाने त्यांनी अनिता पवार या महिलेला गावकऱ्यांच्या मदतीने वर काढले.

पतीविरुद्ध तक्रार देण्यास महिलेचा नकार

अनिता पवार यांना विहिरीबाहेर काढल्यानंतर त्यांनी पतीविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत पडल्यानंतर अनिता यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. अनिता यांचा पती त्यांना वरून दगड मारून ठार मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र सुदैवाने त्यांच्या डोक्याला किंवा इतर कोणत्याही वर्मी भागाला गंभीर इजा न झाल्याने अनिता पवार यांचे प्राण वाचले."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news