Beed Accident
पात्रुड : तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाविकांच्या कारचा आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आज सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या माजलगाव तालुक्यात शिंदेवाडी फाट्यानजीक झालेल्या या भीषण अपघातात माजलगाव शहरातील गजानन नामदास यांच्यासह चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या माजलगाव-तेलगाव-धारूर या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत तसेच रस्त्याला मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत; त्यामुळेच हे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आज (दि. १८) पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर एक अनियंत्रित भरधाव ट्रक जाऊन धडकल्याने १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. धान्याने भरलेला हा ट्रक पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून थेट मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर आणि गेटवर आदळला, ज्यामुळे हा मोठा अनर्थ घडला.
ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना पहाटेच्या सुमारास छिनोर बाजूकडून खाली उतरणाऱ्या रस्त्यावर घडली. या मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी आहे. अपघातानंतर एकूण ३९ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला. ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.