Beed News : आईच्या हातातून निसटली चिमुरडी; ट्रॉलीरखाली चिरडून जागीच मृत्यू  File Photo
बीड

Beed News : आईच्या हातातून निसटली चिमुरडी; ट्रॉलीरखाली चिरडून जागीच मृत्यू

ऊसतोड मजुरांच्या स्थलांतराचा हृदयद्रावक चेहरा

पुढारी वृत्तसेवा

Beed Little girl slipping from mother's arms; crushed under trolley, dies on the spot

धारूर, पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी ऊसतोड हंगाम सुरू होताच हजारो कुटुंबांचे संसार गाड्यांच्या चाकांवर बसवले जातात. घरोघरी दिवाळीचा सण उजाडायच्या आधीच हजारो ऊसतोड मजूर आपल्या लेकरा बाळांसह दूरवरच्या कारखान्यांकडे मार्गस्थ होतात. या स्थलांतराच्या यात्रेत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो, पण आयुष्याचा तुकडाच गमावण्याची शक्यता कायम डोक्यावर राहते. अशाच एका हृदयद्रावक घटनेने बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील देवदहिफळ गाव काळवंडून गेले - केवळ अडीच वर्षांची चिमुरडी आर ोही विशाल बडे हिचा कर्नाटक राज्यातील कोल्हारजवळ रविवारी (ता. २६) झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

देवदहिफळ येथील महादेव बडे हे ऊसतोड मुकादम आहेत, तर त्यांचा मुलगा विशाल बडे हे कर्नाटकातील बैलहोंगल तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतुकीचे काम पाहतात. शुक्रवारी रात्री विशाल बडे पत्नी आरती, मुलगा अविराज आणि मुलगी आरोही यांच्यासह ट्रॅक्टरने कर्नाटककडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान ते रविवारी सकाळी कोल्हार येथे थांबले, चहापाणी करून पुन्हा कारखान्याकडे निघाले. तेवढ्यात आईच्या कुशीत बसलेली आरोही अचानक हातातून निसटली आणि ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडली गेली.

या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. क्षणात संसार उद्धस्त झाला. आईच्या आक्रोशाने वातावरण दुभंगले, तर वडिलांचा टाहो ऐकून उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले. एका क्षणात त्यांच्या हातातली आयुष्याची चिमूटभर आसही निसटून गेली होती. कोल्हार येथे शवविच्छेदनानंतर रविवारी मध्यरात्री देवदहिफळ येथे आरोही वर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावभर हळहळ, सन्नाटा आणि अश्रृंनी भारलेले वातावरण पसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT