Beed Crime : अवघड जागी लाथ मारल्याने पतीचा मृत्यू File Photo
बीड

Beed Crime : अवघड जागी लाथ मारल्याने पतीचा मृत्यू

कौटुंबिक वाद, दारूचे व्यसन आणि सातत्याने सुरू अस-लेला तणाव अखेर एका पतीच्या जीवावर बेतला.

पुढारी वृत्तसेवा

Beed Husband dies after kicking over family dispute

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वाद, दारूचे व्यसन आणि सातत्याने सुरू अस-लेला तणाव अखेर एका पतीच्या जीवावर बेतला. अंबाजोगाई शहरात पती-पत्नीतील भांडणादरम्यान पत्नीने पतीच्या अवघड जागी लाथ मारल्याने पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृताचे नाव कैलास सरवदे (३७) असे असून, तो अंबाजोगाईत पत्नी माया व दोन मुलांसह राहत होता. कैलास शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आणि दारू पिण्याच्या सवयीचा होता. त्यामुळे दाम्पत्यातील भांडण नित्याची बाब झाली होती. माया हिला पतीच्या दारूच्या व्यसनामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

दि. १० सप्टेंबर रोजी दारू पिऊन घरी आलेल्या कैलाससोबत मायाने नेहमीप्रमाणे वाद घातला. संतापाच्या भरात मायाने त्याला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथ मारली. नातेवाइकांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र मायाने हा आमच्या घरगुती वादाचा मुद्दा असल्याचे सांगून त्यांना हाकलून दिले.

त्यानंतर कैलास बेशुद्धावस्थेत दिसून आला. नातेवाइकांनी त्याला अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यूचे कारण दारूचे अतिसेवन मानले जात होते. परंतु दुसऱ्या दिवशी झालेल्या शवविच्छेदनात पोटावर व अवघड जागी बसलेल्या लाथेमुळे झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

मृत कैलास सरवदेची बहीण ज्योती शिवाजी तरकसे यांच्या फिर्यादीवरून पत्नी माया कैलास सरवदे हिच्याविरुद्ध अंबाज- ोगाई शहर पोलिस ठाण्यात कलम १०५ बीएनएसप्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT