Beed News : बीडमध्ये बॅनरवरून होऊ लागला राडा !

शिंगारवाडी फाट्यावर लक्ष्मण हाकेंच्या बॅनरला काळे फासले; पोखरीत रास्ता रोको
Beed News
Beed News : बीडमध्ये बॅनरवरून होऊ लागला राडा ! File Photo
Published on
Updated on

Law and order issue over banner in Beed

बीड, पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यात बॅनरवरील मजकूर आणि त्याला काळे फासण्याबरोबरच फाडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे त्या त्या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला असून या विरोधात पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. गुरुवारी लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या बॅनरला शिंगारवाडी फाटा येथे काळे फासण्यात आले तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ बीड-परळी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

Beed News
Gevrai UpSarpanch Death: गेवराईतील माजी उपसरपंचाच्या मृत्यूप्रकरणात ट्विस्ट; नातेवाईकांना वेगळीच शंका

बीड जिल्ह्यात ओबीसी-मराठा आरक्षणाच्या कारणावरून वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणान्य घटना घडू लागल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी भोगलवाडी फाटा येथे संत भगवानबाबा, अहिल्यादेवी होळकर व गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.

यानंतर पोलिसांनी कारी येथील सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यापूर्वी पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोखरी मैदा परिसरात मनोज जरांगे पाटील यांचे लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले होते. त्या प्रकरणात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गुरुवारी दुपारी बीड परळी मार्गावर मराठा समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Beed News
Beed Crime : बीडमध्ये मुलीचा खून करून पित्याने आपले जीवन संपवले

यावेळी गंगाधर काळकुटे यांच्यासह वडवणी, बीड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती. या दरम्यानच शुक्रवारी कल्याण-विशाखापट्टणम मार्गावर शिंगारवाडी फाटा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जाहीरसभा होणार आहे. या सभेनिमित्त त्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने काळे फासले. या बॅनरवर विविध महापुरुषांसह ओबीसी नेत्यांचे फोटो होते. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यात बॅनर लावणे, त्यावरील मजकूर तसेच इतर प्रकारांमुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.

हाकेंच्या बॅनरला दुग्धाभिषेक

शिंगारवाडी फाटा येथे हाके यांच्या बॅनरला काळे फासण्यात आल्याची माहिती मिळताच ओबीसी आरक्षण आंदोलकांनी व सभेच्या आयोजकांनी त्या ठिकाणी धाव घेत या बॅनरला दुग्धाभिषेक केला. तसेच यापुढे असे प्रकार सहन केले जाणार असा इशारा देत या प्रकरणात कारवाईची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news