sindphana river farmer swept away pudhari photo
बीड

Beed News | गेवराईतील सिदंफणा नदी पात्रात शेतकरी वाहून गेला; एनडीआरएफच्या पथकास पाचारण

Beed News | गेवराईतील सिदंफणा नदी पात्रात शेतकरी वाहून गेला; एनडीआरएफच्या पथकास पाचारण

पुढारी वृत्तसेवा

Beed News sindphana river farmer swept away

गेवराई - बीडमधील गेवराईच्या सिदंफणा नदीच्या पात्रात शेतकरी वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. पोलीस अन् महसूल प्रशासनाकडून वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरु आहे. शोध लागत नसल्याने अखेर आज छत्रपती संभाजीनगर येथील एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आलीय.

संदीपान रामकिसन ढोरमारे (वय ५०, रा. पिंपळगाव कानडा, ता. गेवराई, जि. बीड) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी शेतकरी संदीपान ढोरमारे हे शेतात जात असताना दुधडी भरून वाहत असलेल्या सिंदफणा नदीच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, अशी माहिती समोर आली आहे. येथील उपसरपंच ईलियास पटेल यांनी घटनेची पोलीस व महसुल प्रशासनास माहिती दिली.

यावरुन पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्याचा शोध सुरु केला. दिवसभर शोधकार्य सुरुच होते. मात्र अंधार होताच शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी सकाळीच पुन्हा शोध घेण्यास प्रारंभ केला. मात्र, शोध लागत नसल्याने अखेर पोलीस व महसूल प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर येथील एनडीआरएफ पथकास पाचारण केले, अशी माहीती गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT