Beed News : लेकीच्या न्यायासाठी अख्खी परळी रस्त्यावर !

भक्कम आधारः पीडितेच्या कुटुंबाला जमा करून दिले ८५ हजार रुपये
Beed News
Beed News : लेकीच्या न्यायासाठी अख्खी परळी रस्त्यावर ! File Photo
Published on
Updated on

A minor was sexually assaulted at Parli Railway Station

प्रा. रवींद्र जोशी

परळी: परळी रेल्वे स्थानकात दिनांक ३१ रोजी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली होती. पंढरपूरच्या कुटुंबातील एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी परळीकरांनी आज (दि.३) एकजुटीने वज्रमूठ दाखवत कडकडीत बंद पाळला. तसेच लाखोच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी होऊन याबाबतचा निषेध नोंदवला. एवढेच नाही तर पीडित कुटुंबाला ८५ हजारांचा निधीही सुपूर्द केला आहे.

Beed News
Thrips Disease : कपाशी पिकांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढला

पंढरपूर येथील एका मजूर कुटुंबावर परळीच्या रेल्वेस्थानकावर अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वेळ आली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आपल्या परळीत घडली याची सल प्रत्येक संवेदनशील, सजग आणि सातत्याने अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा असलेल्या तमाम परळीकरांच्या मनाला खटकली.

चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील हैवानाला फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात्त चालवावे या मागणीसाठी उस्फूर्तपणाने बंद पाळून ना जात ना धर्म ना पंथ असा कुठलाही भेदभाव न ठेवता एकजुटीने अख्खी परळी या लेकीच्या न्यायासाठी आणि हैवानी वृत्तीला वेळीच ठेचण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे परळीकरांच्या संवेदनशीलतेचे व सकारात्मकतेचे चित्र आज परळीत बघायला मिळाले. अठरापगड जाती, धर्मातील परळीकर केवळ निषेध नोंदवण्यासाठीच रस्त्यावर उतरले नाहीत तर पीडितेचे पुनर्वसन व्हावे यासाठी गरजवंत असलेल्या या कुटुंबाला मोठा आधार देण्याचे कामही परळीकरांच्या माध्यमातून करण्यात आले.

Beed News
Beed Crime : पाणीपुरी लवकर देत नसल्याने तरूणाची सटकली; विक्रेत्यावर केला स्क्रू ड्रायव्हरने हल्ला

या पीडितेच्या कुटुंबाला भरभक्कम आर्थिक आधार मिळावा यासाठी पै-पै जमा करण्यात आली. यात तब्बल ८५ हजार रुपये आज घडीला या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले. रेल्वे स्थानकात घडलेल्या चिमुकली वरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी परळीत सर्व स्तरातून सुरुवातीपासूनच संताप व्यक्त केला जात होता. प्रभु वैद्यनाथाच्या पवित्र भूमीत अशा प्रकारचे कृत्य करणारी हैवानी वृत्ती निपजत असेल तरा याला वेळीच ठेचले पाहिजे यासाठी आणि अशा नीच वृत्तीच्या विरोधात संवेदनशील व सकारात्मक वृत्ती असलेल्या परळीकरांनी एकत्रित येत उत्स्फूर्तपणाने आज दिवसभर कडकडीत बंद पाळला, राणी लक्ष्मीबाई टॉवरपासून निषेध मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा निषेध मूक मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून रेल्वे स्थानकापर्यंत गेला. या मूक मोर्चात परळी शहरातील सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील, विविध सामाजिक संघटना, संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या मूक मोर्चामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या हैवानाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.

तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे ही लक्ष वेधत सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जी करण्यात आलेल्या आरपीएफ व रेल्वे पोलिस यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन निदर्शने करून देण्यात आले. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्टट्रॅक वर प्रकरण चालले पाहिजे, आरपीएफच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, रेल् वेच्या सुरक्षेचा प्रश्न गांधीयनि घेतला पाहिजे या मागण्यांसाठी केवळ बंद पाळून व निदर्शन करून निषेध न करता प्रत्यक्ष पीडितेला आधार देण्यासाठी तमाम परळीकर संवेद नशील असल्याचेही उदाहरण बघायला मिळाले. या मूकमोर्चाच्या अनुषंगाने मूक मोर्चात चालत चालत आर्थिक मदत निधी उभा करण्यात आला. यामध्ये तब्बल ८५ हजार रुपये जमा झाले.

ही आहे खरी परळीची संस्कृती

दरम्यान या अन्यायकारक व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या माध्यमातून सर्व स्तरातून घटना घडल्यापासूनच संताप व चीड ही तमाम परळीकरांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवते. त्याचबरोबर बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचा अन्याय आपल्या भूमीत होऊ नये ही भावना तमाम परळीकरांची असल्याचेही अधोरेखित झाले, त्याचप्रमाणे वा लेकीसाठी जात, धर्म, पंथ याच्या कोणत्या मर्यादा आडव्या आल्या नाही. सर्वांनी एकजुटीने व ताकदीने या पीडित कुटुंबाच्या पाठीशी आपला भरभक्कम आधार उभा केला. केवळ निषेधच नाही तर या पीडित कुटुंबाला व पीडितेचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा आर्थिक निधी उभा करण्याचे सामाजिक भानही याच परळीकरांमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे उठ सूट कोणत्याही कारणाने परळीची प्रतिमा खलनायकी करुन कांगावा करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक या माध्यमातून परळीकरांनी दिली आणि ही पहा ही आहे खरी परळीची संस्कृती हेच दाखवून दिल्याचे दिसत आहे.

स्थानक परिसरात आढळलेल्या बेवड्याला दिला चोप

दरम्यान, हा मूक मोर्चा रेल्वे स्थानकाच्या परिसरात असतानाच याच परिसरात दारूच्या नशेत असलेला एक वेवडा या परिसरात दबा धरून बसलेला होता. काही मोर्चेकरी महिलांच्या ही बाब निदर्शनास आली. या महिलांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याने महिलांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता अशा प्रकारच्या नशेड़ी ब बेवड्यांमुळेच रेल्वे स्थानक परिसरात अत्याचाराच्या अशा घटना घडतात या भावनेतून या महिलांनी जागेवरच चपला काढत या बेवड्याला चांगलाच चोप दिला. त्याचबरोबर अन्य मोर्चेकरांनी ही बाब पोलीस प्रशासन व उपस्थित असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील नशेड्यांच्या विळख्यात असलेला परिसर व आज मोर्चाच्या वेळीच प्रत्यक्ष निदर्शनास आलेले उदाहरण यामुळे आता तरी प्रशासन याकडे गांभीयनि बघणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news