बीड

Beed News : बीडचे शेतकरी दुग्ध व्यवस्थापनाचे धडे गिरवण्यासाठी गुजरातला रवाना

राष्ट्रीय दुग्ध विकास संस्थेमध्ये तीनदिवसीय प्रशिक्षण; कृषी विभागाचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Beed farmers leave for Gujarat to learn dairy management lessons

बीड, पुढारी वृत्तसेवा : दुग्ध उत्पादन, जनावरांचे आरोग्य, गोठा व्यवस्थापन व दुग्ध जन्य पदार्थ विक्री व्यवस्थापनाचे या विषयाचे दिनांक १३ ते १५ जुलै या कालावधीत राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था आनंद, गुजरात येथे 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे त्या प्रशिक्षणाकरिता प्रकल्प संचालक आत्मा बीड कार्यालयामार्फत शेतकरी बांधवांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यास प्रतिसाद म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी नोंदणी केली. त्यातीलच प्रशिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांची पहिली बॅच दिनांक १२ जुलै रोजी रवाना झाली आहे. कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय दादाराव जाधवर व अॅड शेख सादेक यांनी हिरवी झेंडी दाखवून शेतकरी प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा बीड यंत्रणे मार्फत विविध शेतकरी प्रशिक्षणाचे सन 2026-27 अंतर्गत नियोजन करण्यात आलेले असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांचे सुचनेनुसार प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे, प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी सर्व तालुके यांचे मार्फत आत्मा योजनेअंतर्गत हा उपक्र राबविण्यात आला. प्रशिक्षणासाठी रवाना झालेल्या शेतकऱ्यांमध्ये माजलगाव तालुक्यातील १४, बीड ०२, धारूर ०४, केज १३ वडवणी १ व परळी तालुक्यातील ९ अशी एकूण ४० शेतकरी उपस्थित होते.

आत्मा यंत्रणे मार्फत सदर शेतकऱ्यांचे प्रवास, प्रशिक्षण, निवास ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यामध्ये अशीच शेतकरी प्रशिक्षणासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आत्ताच आपले तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील आत्मा यंत्रणेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी अशी आवाहन केले आहे. या प्रशिक्षणाचे आयोजन व शेतकऱ्यांचे प्रवासाची नियोजनासाठी आनंद मुंडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, केज, अनंत फुटाणे, सहाय्यक कृषी अधिकारी वडवणी व जुबेर पठाण, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, बीड यांनी अथक परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT