लिंबागणेश परिसरात धावत्या कारला अचानक आग लागली  Pudhari
बीड

Car Fire Beed | धावत्या कारला अचानक आग; डॉक्टर दांपत्याचे प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Beed News | बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Car Fire Doctor Couple Escape

बीड : बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात रविवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, डॉक्टर दांपत्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

डॉ. भारत मेंगडे आणि डॉ. प्रतिभा मेंगडे हे बोरखेड येथील शेतात बोअरवेलसाठी येणाऱ्या यंत्रसामग्रीची पाहणी करण्यासाठी निघाले होते. महाजनवाडी फाट्याजवळ त्यांच्या Tata Indica Vista (एमएच २३ वाय २३२१) या कारमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ वाहन थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही क्षणांतच कारने पेट घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. भारत मेंगडे यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली; मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, सय्यद अख्तर आणि सुमित मुळे यांच्यासह महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी तसेच शिवाजी घरत, सतीश घरत, ऋषिकेश घरत, अभिषेक घरत आणि अक्षय घरत यांनी आग विझविण्यास सहकार्य केले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मात्र नागरिकांनी धीर आणि संयम राखत परिस्थिती हाताळली. डॉक्टर दांपत्याच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT