Pankaja Munde : या गाडीला शोभेल असे पद माधव निर्मळ यांना द्यावे लागेल file photo
बीड

Pankaja Munde : या गाडीला शोभेल असे पद माधव निर्मळ यांना द्यावे लागेल

मंत्री पंकजा मुंडे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

beed dharur bjp Pankaja Munde political news

धारूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी माधव निर्मळ यांनी नुकतीच नवीन चारचाकी वाहनाची खरेदी केली. या वाहनाच्या पूजनासाठी राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

वाहनाच्या पूजनानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी काही क्षण वाहनाचे स्टीअरिंग हातात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी, या गाडीला शोभेल असे पद माधव तात्या निर्मळ यांना द्यावे लागेल असे वक्तव्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातील छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. माधव निर्मळ यांनी गेल्या काही वर्षांत पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. विविध पक्षीय उपक्रम, जनसंपर्क मोहिमा आणि संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेत किंवा मत एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसंदर्भात त्यांच्याबाबत चर्चा सुरू असल्याचे राजकीय निरीक्षकांचे आहे. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांच्या या कथित विधानानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT