जन्मठेप FIle Photo
बीड

Beed Crime News : चुलत्याची हत्या करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा

खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून धारदार कत्तीने केले होते वार

पुढारी वृत्तसेवा

Beed Crime News: Nephew sentenced to life imprisonment for murdering uncle

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :

खर्चासाठी पैसे दिले नाहीत, या रागातून आपल्या सख्ख्या चुलत्यावर कत्तीने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपी पुतण्यास अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपी अर्जुन दत्तात्रय धोंगडे (रा. घटनांदूर, ता. अंबाजोगाई) याला सोमवारी (दि. २३) सश्रम जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जानेवारी २०२१ साली घाटनांदूर येथे ही घटना घडली होती.

अधिक माहितीनुसार, घाटनांदूर येथील जनार्धन धोंगडे हे ४ जा-नेवारी २०२१ रोजी कामावरून घरी परतत असताना, त्यांना आर- ोपी पुतण्या अर्जुन धोंगडे याने घर-ाजवळच अडवले. आदल्या दिवशी खर्चासाठी पैसे का दिले नाहीत, याचा राग मनात धरून अर्जुनने भररस्त्यात जनार्धन धोंगडे यांच्यावर धारदार कत्तीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या जनार्धन यांना त्यांची मुलगी आणि भावाने तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते.

याप्रकरणी मृताची मुलगी वैशाली वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासाअंती एपीआय एस. व्ही. सावंत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकारने एकूण ७ साक्षीदार तपासले. यामध्ये जनार्धन यांची मुलगी फिर्यादी वैशाली आणि प्रत्यक्षदर्शी हनुमंत धोंगडे यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

आरोपीकडून मानसिक रुग्ण असल्याचा बनाव

आरोपीच्या वतीने मानसिक रुग्ण असल्याचा आणि वेडाच्या भरात कृत्य केल्याचा बचाव घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र सरकारने तीन डॉक्टरांची साक्ष नोंदवून आरोपी मानसिक रुग्ण नसल्याचे सिद्ध केले. न्यायालयाने आरोपीचा बचाव फेटाळून लावत पुराव्यांच्या आधारे ही कडक शिक्षा सुनावली. सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांना अॅड. सचिन कुलकर्णी यांनी सहकार्य केले. हेड कॉन्स्टेबल भाग्यश्री उडाणशीव यांनी पैरवी म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT