बीड

Beed crime : बसस्थानक परिसरात महिलांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने चोरी

Beed bus stand theft: दोन महिला जेरबंद, नेकनुर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नेकनुर : येथील बसस्थानक परिसरात एकट्या महिलांना लक्ष्य करून हातचलाखीने दागिने चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली. नेकनूर पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

नेकनूर बसस्थानक परिसरात 6 जुलै रोजी एका महिलेच्या पिशवीतील अंदाजे 77 हजार 400 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलांनी चोरून नेले. या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत घटनास्थळावरील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहिती तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. सोजर सूरज भोसले (वय 35 वर्षे, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड), शबाना अरुण काळे (वय 26 वर्षे, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) असल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार त्यांना नेकनूर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.

आरोपींची चोरी करण्याची पद्धत

बसस्थानक अथवा बसमध्ये प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांना हेरून त्यांच्याशी संवाद साधला जात असे."गर्दीमध्ये गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला जाऊ शकतात. माझ्यासोबतही अशी घटना घडली होती, त्यामुळे दागिने पिशवीत ठेवा," असे सांगून पीडित महिलेचा विश्वास संपादन केला जात असे. त्यानंतर आरोपी महिला स्वतःबरोबर असलेल्या लहान मुलाला दूध पाजण्याचा किंवा इतर कारणाने संवाद वाढवत पीडित महिलेशी जवळीक साधत असत. दोन्ही आरोपी महिला पीडितेला सतत बोलण्यात गुंतवून तिचे लक्ष विचलित करत असत. योग्य संधी साधून हातचलाखीने पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार होत असत. सदरची कामगिरी नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या नेतृत्वात पोह विशाल क्षीरसागर, पोह विद्वान कांबळे व पोह मुळे यांनी पार पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT