गौतम बचुटे
केज :- प्रसूती वेदना जाणवू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका गरोदर मातेच्या पती आणि इतर नातेवाईका विरुद्ध बलात्कार आणि पोक्सोचा गंभीर गुन्हा दाखल होण्याच्या शक्यतेने खळबळ माजली आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथील एका गरोदर मातेला तिचे नातेवाईक केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आले. दाखल करून घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि आधार कार्डची मागणी करण्यात आली. आधार कार्डवरील त्या गरोदर मातेची जन्म तारीख पहिली असता सदर गरोदर माता ही १५ वर्षाची अल्पवयीन असल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ती गरोदर माता ही १५ वर्ष वयाची अल्पवयीन असल्याचे निष्पन्न होताच उपजिल्हा रुग्णालय प्रशासना कडून केज पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. या माहिती वरून तिचा पती यांच्या विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून इतर नातेवाईक यांच्यासह लग्न लावून देणारे यांच्या विरुद्ध बालविवाह लावून दिल्याचा गुन्हा दाखल होण्याची खात्रीशीर शक्यता आहे.
अल्पवयीन मातेने दिला मुलीला जन्म
अल्पवयीन गरोदर मातेची दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १:०४ वाजता प्रसूती झाली आहे. त्या मातेने एका मुलीला जन्म दिला आहे. बाळाचे वजन ३.१ किलो ग्रॅम वजन आहे. प्रसूती झाली त्यावेळी वैद्यकीय अधिकारी म्हणू डॉ. फिजा मॅडम तर भूलतज्ज्ञ डॉ. स्वाती साखरे या कर्त्यव्यावर हजर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली आहे.
बालविवाह निदर्शनास आल्यास कारवाई अटळ
विवाहावेळी मुलीचे वय १८ वर्ष तर मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण आवश्यक असुन त्याचे आला उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई अटळ आहे. यासाठी बालविवाह टाळणे आवश्यक असू. जर बालविवाह निदर्शनास आले तर त्याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे.