Beed News : आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

दोन कोटी ७० लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग
Beed News
Beed News : आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत File Photo
Published on
Updated on

10 lakhs help to the families who sacrificed for maratha reservation

बीड, पुढारी वृत्तसेवाः मराठा आर क्षणाच्या मागणीसाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ३० पैकी २७ कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाखांची मदत दिली जाणार आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ७० लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत ही मदत संबंधित कुटुंबियांना मिळणार आहे. कक्ष अधिकारी शरद घावटे यांच्या स्वाक्षरीने निधी वर्ग झाल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

Beed News
Bajarang Goykar News| संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती? पवनचक्की माफियाकडून माजी सरपंच बजरंग गोयकर यांना बेदम मारहाण

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने निर्माण झालेली हातबलता आणि शिक्षण-नोकऱ्यांतील अधोगतीमुळे अनेक तरुणांनी आत्मबलिदानाचा मार्ग स्वीकारला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे यांनी पाण्यात उडी मारून दिलेल्या बलिदानानंतर आंदोलनाला उग्र वळण मिळाले. त्यानंतर अनेक जिल्ह्यांत आरक्षणासाठी आत्मबलिदानाच्या घटना घडल्या. जुलै २०२३ पासून फेब्रुवारी २०२५ या काळात तब्बल ६२ जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले.

यापैकी ३२ कुटुंबियांना मदत पोहोचली असून, आता आणखी २७कुटुंबियांना मदतीचा दिलासा मिळणार आहे. या यादीत संजय मस्के (गवळवाडी), आदिनाथ मस्के (बाहेगव्हाण), कृष्णा तातोडे (नित्रुड), सुहास शिंदे (वरवटी), प्रविण सोनवणे (शेरी), महादेव पवार (राक्षसभुवन), आबासाहेब शिंदे (माटेगाव), प्रविण सुळे, बापुसाहेब काळे (लुखासमला), अंगद लोणकर, कल्याण मते (लोणी शहाजानपुर), भरत इंदुरे (शहाजानपूर दगडी), दत्ता महिपाल (शिंदेवाडी), महेश शेळके (जुजगव्हाण), भागवत गायके (सौंदना), अरुण सुरवसे (आहेर चिंचोली), भारत रसाळ (मांजरसुंबा), लक्ष्मण मोरे (चांदणी), बापुराव कवडे (खापरपांगरी), अर्जुन कवठेकर (नायगाव, पाटोदा), सुनिल वाकुरे (पालवण), अभिषेक इंगोले (आहेर धानोरा), प्रविण पिंगळे (शिरापूर धुमाळ), अतुल कवचट (केसापुरी, परभणी), गणेश शेंबडे (शेकटा), हनुमंत शिंदे (नागझरी) यांचा समावेश आहे.

Beed News
Beed News : 'मुरकुल्या आमदार चौथी पास खुळखुळ्याला पाठिंबा देतो'

तानाजी सावंत यांचीही मदतीची परंपरा कायम

आरक्षण आंदोलनात प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्वप्रथम मदतीचा हात देणारे तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा संवेद-नशीलता दाखवली आहे. जिल्ह्यातील दिवंगत सतीश देशमुख, महारुद्र खाकरे आणि भरत खरसाडे यांच्या कुटुंबियांना त्यांनी प्रत्येकी तीन लाखांची मदत दिली आहे. यावेळी महेश डोंगरे, स्वप्नील गलधर, अशोक रोमन आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news