Crime News  pudhari
बीड

Beed Crime : घरफोडी करणारा चोरटा दोन तासांत मुद्देमालासह जेरबंद

चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त

पुढारी वृत्तसेवा

बीड ः शहरातील शाहूनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झालेल्या घरफोडीचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उघडकीस आणला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

सतिराम तुकाराम ढोले (रा. बीड) यांचे शाहूनगर भागात बांधकाम सुरू आहे. दि. 29 मे रोजी रात्री अज्ञात चोरट्याने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीतील बॉश कंपनीची लोखंड कापण्याची कट-ऑफ मशीन आणि एक इलेक्ट्रिक मशीन असा एकूण 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त माहिती व तांत्रिक विलेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शेख शाहिनशाह शेख बशीर (रा. इस्लामपुरा, बीड) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन्ही मशीन जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस जमादार विकास रेवाळे, रवींद्र आघाव, ज्ञानेश्वर मराडे, अनिल घटमळ, बाळू रहाडे, दिलीप राठोड आणि आबेद पठाण यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT