Chandrapur Burglary | आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ५७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, मध्यप्रदेशातून चौघांना अटक

३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने, कार व मोबाईल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची संयुक्त कारवाई
Interstate Burglary Gang Arrested
चंद्रपूर पोलिसांकडून मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली Pudhari
Published on
Updated on

Interstate Burglary Gang Arrested

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात झालेल्या घरफोडीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यात दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी शुभम प्रदीप बारथमवार (वय ३०) रा. चिंतामणी रेसिडन्सी, वडगाव यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ फेब्रुवारी रोजी ते कुटुंबासह राजुरा येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यावर घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

Interstate Burglary Gang Arrested
Chandrapur Tiger News | मोहर्ली–पद्मापूर रस्त्यावर वाघाचा पाठलाग; व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वनगुन्हा दाखल

याच दिवशी वडगाव येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ. ज्योती दिनेश चंदनपाट (वय ५४) यांच्या घरातही घरफोडीची घटना घडली होती. त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिली.

या दोन्ही तक्रारींवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६५/२०२६ आणि २६६/२०२६ नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

घटनांचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा) आणि पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख (रामनगर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.

Interstate Burglary Gang Arrested
Chandrapur Municipal Corporation : ईश्वरचिठ्ठीने ठरला चंद्रपूर मनपाचा स्थायी सभापती; मनस्वी गिऱ्हे विजयी

पथकांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. जवळपास १० ते १२ दिवस विविध कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण करून संशयितांचा माग काढण्यात आला. या तपासात आरोपी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना केले. सुमारे दहा दिवस सतत शोधमोहीम राबवून मौजा तांडा, जिल्हा धार परिसरातून राकेश मंगलसिंग मेहडा (वय २५) रा. बघोली, ता. कुकशी, जि. धार (मध्यप्रदेश), कंचन भगतसिंग मंडलोही (वय ४०) रा. बघोली, ता. कुकशी, जि. धार (मध्यप्रदेश), थानसिंग मेहतु भुरीया (वय २६) रा. बडीउपी, ता. जोबट, जि. अलीराजपूर (मध्यप्रदेश), महेश कालू भुरीया (वय २५) रा. गुराडिया, ता. कुकशी, जि. धार (मध्यप्रदेश) चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून चोरीस गेलेले ३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यांची किंमत अंदाजे ५१ लाख ९८ हजार रुपये आहे जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले GJ 14 AP 4098 क्रमांकाचे चारचाकी वाहन (किंमत अंदाजे ५ लाख रुपये) आणि सहा मोबाईल (किंमत अंदाजे ६० हजार रुपये) जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

Interstate Burglary Gang Arrested
Chandrapur Tiger News : ताडोबा परिसरात वाघाचा थरारक पाठलाग; पर्यटकांचा तो 'स्टंट' भोवला, वनविभागाकडून गुन्हा दाखल

अटक आरोपींकडून पुढील चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चार घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या टोळीने आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, सपोनि शिवाजी नागवे, पोउपनि कृष्णा दराडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस व रामनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news