Beed News : खंडित ७३ शिक्षकांची यादीच शिक्षण उपसंचालक दातखिळ यांनी दडवली file photo
बीड

Beed News : खंडित ७३ शिक्षकांची यादीच शिक्षण उपसंचालक दातखिळ यांनी दडवली

बोगस शिक्षक भरती प्रकरण : बीड शिक्षण विभागाकडून टोलवाटोलवी तर आयुक्तांचे हात वर

पुढारी वृत्तसेवा

Beed Bogus Teacher Recruitment Case

बीड पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती मधील पहिल्या टप्प्यात 73 माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची सेवा कायमची खंडित करण्याचे आदेश देण्यात आले असून हे शिक्षक कोणत्या संस्थेचे, त्यांची यादी या बाबत मात्र कमालीची गुप्तता शिक्षण उपसंचालक दातखिळ यांनी ठेवली असून त्यांनी ही गुप्तता का आणि कशासाठी ठेवली या बाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तर ह्या शिक्षकांची तेव्हा दातखिळ यांनीच बोगस भरती केली असल्याचा आरोप तक्रारदार इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात मागील सात ते आठ वर्षात शिक्षण विभागातील सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर मागील तरखेत भरती दाखवून बोगस भरती करण्यात आली. या भरती प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्याचे शिक्षण उपसंचालक दातखिळ यांच्या या संच मान्यतेवर तसेच इतर महत्वाच्या आदेशावर सह्या असून त्यामुळे ते या सर्व प्रकरणावर पडदा घालत असल्याचा गंभीर आरोप या बोगस भरती प्रकरणा संदरभट तक्रार करणारे तक्रारदार इंजि. सादेक इनामदार यांनी केला आहे.

या संपूर्ण बोगस भरती प्रकरणी आपण दैनिक पुढारी माध्यम समूहाच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवला असताना आपल्या तक्रारी वरून अनेक चौकशी समिति स्थापन झाल्या, त्यांनी चौकशी केली आणि पहिल्या टप्प्यात 73 शिक्षक यांची सेवा खंडित करण्यात आली. मात्र ही शिक्षक कोणत्या संस्थेत सेयाव देत होते तसेच त्यांच्या नावाची यादी या बाबत मात्र उपसंचालक दातखिळ यांनी कमालीची गुप्तता राखली, एवढेच नाही तर त्यांनी तसे शिक्षणाधीकारी बीड यांना देखील तोंडी आदेशा द्वारे दिले. याबाबत बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी याबाबत दैनिक पुढारीला लेखी कळवले आहे.

दरम्यान याबाबत शिक्षण उपसंचालक दातखिळ यांच्याशी सातत्याने दैनिक पुढारीने संपर्क साधण्य प्रयत्न केला अनेक वेला फोन केल्या नंतर एकदा चुकून उचलल्या गेलेल्या कॉल वर त्यांनी आपण असे काही आदेश लेखी स्वरूपात दिली नाही असे सांगून फोन कट केला.

या कारवाई बाबत सातत्याने त्यांच्या कार्यालयात तसेच बीड येथील जिल्हा वेतनश्रेणी अधीक्षक कार्यालय, शिक्षणाधीकारी कार्यालय या ठिकाणी यादी आणि संस्था याबाबत माहिती विचरण केली तर एकही कर्मचाऱ्यांनी या बाबत कुठलीही अधिकृत अथवा अशीच माहिती दिली नाही, शिक्षण उपसंचालक यांची एवढी दहशत बीड जिल्हा कार्यालयात पाहावयास मिळाली की या बाबत विषय काढला की कर्मचारी अधिकारी हे पळ काढू लागले. जाता जाता आमच्या नौकारीचा प्रश्न आहे असे ही काही जनानी खाजगी मध्ये सांगितले.

एकूणच राज्यातील शिक्षण व्यवस्था कक्ष पद्धतीने काम करते याचा यातून अनुभव आला असून केलेले पाप झाकण्यासाठी अधिकारी किती खालच्या पातळीवर जातात याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे.

राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी मुख्यमंत्री यांनी नागपूर मध्ये या विषयावरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत "झीरो टोलरन्स" अशी पॉलिसी तेव्हा सांगितली होती मात्र ती अशा पद्धतीने समोर येईल ही आता कळून चकले आहे.

माहिती गोपनीय ठेवण्याचे आदेश : प्रियाराणी पाटील

बीड जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती प्रकरणी आता पर्यन्त 73 शिक्षक यांची सेवा खंडित केली असून या बाबत माध्यमांना कुठलीही माहिती देऊ नये असे वारिष्ट शिक्षण उपसंचालक दातखिळ यांनी तोंडी आदेशा द्वारे कळविले असून आम्हाला ती माहिती देता येत नाही.

शिक्षण मंत्री बोगस शिक्षक भरतीप्रकरणी अनभिज्ञ !

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी या बोगस भरती प्रकरणा बाबत माहिती घेण्यासाठी त्यांच्या मंत्रालयात वेळोवेळी कॉल केले मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या कडून साहेब मीटिंग मध्ये आहेत, हे दरवेळी ऐकावयास मिळाले, कर्तव्यनिष्ठ मंत्र्याकडून जर अशा पद्धतीने त्यांच्या विभागातील मोठ्या घोटल्या विषयी जर बोटचेपी भूमिका असेल तर या विभागाचे अवघड आहे असेच म्हणावे लागेल.

शिक्षण आयुक्त यांचे कानावर हात ..!

बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रकाश सिंह यांच्याशी संपर्क साधला असतं त्यांनी राज्यात 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यातील पत्राकरशी या विषयावर मी बोलू का? असे सांगून त्यांनी या बाबत संबंधित यांच्याकडून तुम्ही तुमच्या पातळीवर माहिती मिळवा असे सांगून प्रकरणा पासून हात झाडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT