Beed Accident : टाकरवन फाट्याजवळ कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Beed Accident : टाकरवन फाट्याजवळ कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
Published on: 
Updated on: 

टाकरवन : तालुक्यातील टाकरवन फाटा परिसरात स्कॉर्पिओ आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ चालकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी स्कॉर्पिओ चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. संतोष रामभाऊ भुबे (वय ३४, रा. टाकरवन) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडी-सावरगाव मार्गावरील टाकरवन फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ पुढे असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. या दुहेरी धडकेत स्कॉर्पिओचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

या अपघातात स्कॉर्पिओ चालक संतोष भुबे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर काळे (रा. धर्मेवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे टाकरवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.