Money Pudhari
बीड

Beed News : माजलगावच्या 'गुलजार-ए-रजा' ट्रस्टचे बार्शीतील 'अल हलिमी' ट्रस्टसोबत आर्थिक संबंध

बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन ?; तपास यंत्रणेकडून सखोल चौकशी

पुढारी वृत्तसेवा

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करत असलेल्या तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील 'गुलजार-ए-रजा' या कथित बनावट ट्रस्टबाबत महत्त्वाची माहिती आहे. समोर आली तपासादरम्यान या ट्रस्टचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील 'अल हलिमी' ट्रस्टसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

एटीएसच्या तपासानुसार, बार्शीतील 'अल हलिमी' या कथित बनावट ट्रस्टचे पाकिस्तानातील 'दावत-ए-इस्लामी' या वादग्रस्त संस्थेशी तसेच दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी संबंधित व्यक्तींशी संपर्क असल्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. या तपासादरम्यान माजलगावच्या 'गुलजार-ए-रजा' ट्रस्टचे बार्शीतील ट्रस्टसोबत आर्थिक संबंध असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात माजलगाव येथील ट्रस्टविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित ट्रस्टचे फॉरेन्सिक ऑडिट ₹५०० ето 701431 सुरू असून आर्थिक व्यवहारांची तपशीलवार पडताळणी केली जात आहे. तपासात 'गुलजार-ए-रजा' ट्रस्टच्या पाच बँक खात्यांमध्ये सुमारे ४ कोटी ७३ लाख रुपयांची देणगी जमा झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. तर 'अल हलिमी' ट्रस्टच्या खात्यांमध्ये सुमारे १० कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

दोन्ही ट्रस्टचे इतर धर्मादाय संस्थांशी काही संबंध होते का, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी काय आहे आणि आर्थिक व्यवहारांचा उद्देश काय होता, याचा एटीएसकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT