Hingoli NEET protest : हिंगोलीत शिक्षणमंत्र्यांच्या पुतळा दहनावरून राडा

नीट पेपरफुटीचे तीव्र पडसाद; कार्यकर्ते अन् पोलिसांत झटापट
Hingoli NEET protest
शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : देशातील नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा गोरेगाव येथे सोमवारी प्रतीकात्मक पुतळा दहन करणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व - पोलिसांत झटापट झाली. पोलिस पुतळा घेऊन पुढे तर कार्यकर्ते मागे असे चित्र पहावयास मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा तसेच देशभरातील विद्यार्थ्यांची माफी मागावी यांसह इतर मागण्यांसाठी जिल्हाभरात आंदोलन सुरू झाली आहे. याशिवाय दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा मिळत असून वसमत, कळमनुरी येथे प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.

Hingoli NEET protest
Parbhani Crime : परभणीत कार्यकर्त्याच्या घरावर गुंडांचा हल्ला

दरम्यान, सोमवारी सकाळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोरेगाव येथे शिक्षण मंत्री प्रधान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, अशोक कावरखे, विठ्ठल वायचाळ, राहुल कावरखे, अमोल गिरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्राच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, इतक्या दिवसांनंतरही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

Hingoli NEET protest
Online Medicine Sales Protest: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बारामतीत केमिस्टांचा बंद

या शिवाय हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दीपके यांच्यावरही दडपण आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री प्रधान यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोरेगाव पोलिसांच्या पथकाने प्रतीकात्मक पुतळा हिसकावून पळ काढला. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news