Beed Crime News : बीडमध्ये आणखी एका ठेवीदाराने जीवन संपवले Pudhari Photo
बीड

Beed Crime News : बीडमध्ये आणखी एका ठेवीदाराने जीवन संपवले

बीडमध्ये पतसंस्थांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे आजवर सतरा आत्महत्या झाल्या.

पुढारी वृत्तसेवा

Another depositor has ended his life in Beed.

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडमध्ये पतसंस्थांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे आजवर सतरा आत्महत्या झाल्या. यातच आता बीड शहरात रा-हणाऱ्या एका ठेवीदाराने गवळवाडी शिवारात गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

अविनाश माने (५०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश माने हे बीड शहरातील धांडे गल्ली भागात राहत होते. त्यांचे गवळवाडी शिवारात शेत असून याच शेतात त्यांनी गळफास घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली.

अविनाश माने व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी रक्कम ज्ञानराधा पतसंस्थेत आहे. परंतु ज्ञानराधा पतसंस्थेत मोठा घोटाळा झाल्याने या पतसंस्थेला टाळे लागले आहे. प्रशासक नियुक्त करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी आता ठेवीदारांमध्ये निराशेची भावना पसर-लेली आहे. अशाच निराशेतून अविनाश माने यांनी गवळवाडी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट सापडली असून ज्ञानराधामधील ठेवी मिळत नसल्याने मी निराश झाल्याचे त्यांनी यामध्ये लिहिले आहे. दरम्यान, या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ठेवींसह मराठा आरक्षणाचा उल्लेख

अविनाश माने यांनी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये मी अविनाश माने कारंजा रोड, धांडे गल्ली, माझे व माझ्या पत्नीचे तसेच आमच्या सर्व कुटुंबाचे ज्ञानराधा पतसंस्थेत पैसे अडकल्यामुळे आम्ही सर्वजण अडचणीत आलो आहोत. आमच्या घराचे बांधकाम करण्यासाठी व इतर घरखर्च व दवाखान्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्याने मी परेशान झालेलो आहे. सरकारने आमचे सर्व नीट करून द्यावे हीच कळकळीची विनंती करतो.

तसेच आरक्षण पण लवकर मिळाले पाहिजे. सर्वांनी दादांच्या सोबत रहावे, त्यांनी समाजासाठी खूप स्वतःच्या जीवाचे हाल केले आहेत, दादांना विनंती करतो की तुम्ही स्वतःच्या तब्येतची काळजी घ्या व आम्हाला सर्वांना न्याय द्या, आम्हाला लवकर न्याय मिळावा हीच कळकळीची विनंती करतो. मनोजदादा स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या व आम्हाला न्याय मिळवून द्या व आई वडील, पत्नी मला माफ करा, म ला जगण्याची इच्छा राहिली नाही, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, फार टेन्शन आहे.... असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT