Ajit Pawar holds the fort of Beed
शशी केवड़कर
बीड, पुढारी वृत्तसेयः बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेसाठी आज मतमोजणी झाली यात गेवराई नगर परिषदेत भाजपच्या मीहा पवार यांचा विजय झाला या ठिकाणी मतदाना पासूनच मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र अंतिम टप्प्यात भाजपने विजय मिळविला, माजलगाव मध्ये देखील अत्यंत चुरशीची लढत होऊन या ठिकाणी शरद पवार गटास विजय मिळविता आला या ठिकाणी आ. प्रकाश सोळंके यांना मात्र जनतेनी नाकारले, तर याच सोळंके यांना धारूर मध्ये जनतेने स्वीकारून नगराध्यक्षपदी चाळासाहेब जाधव यांना निवडून दिले.
अंबाजोगाई मध्ये अजित पवार गट आणि भाजप यांनी चक्क आघाड करत एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. हि निवडणूक शेवटच्या क्षण पर्यंत चुरशीची ठरली असताना यात भाजप पुरस्कृत नंदकिशोर मुंदडा हे विजयी झाले. बीड मध्ये तर शेवटच्या फेरी पर्यंत काय निकाल लागेल हे कळने अशक्य वाटत होते मात्र संपूर्ण मतमोजणी झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्च्या प्रेमलता पारवे ह्या ३७७९ मताधिक्याने भाजपच्या डॉ. ज्योती मुम्बरे यांचा पराभव करून निवडून आल्या. दरम्यान बीड जिल्ह्यात महायुती एक, भाजप, अजित पवार गटाने दीन जागेवर तर शरद पवार गटाने एके ठिकाणी गड राखला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल इंजिनिअरिंग चा विजय झाला असून, एक सामान्य सिटीझन प्रेमलता पारवे या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. यामुळे 'लाख बुरा चाहे जमाना पर वही होता है जो मंजुरे खुदा' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बीड नगर परीषदेची दोन राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. यामध्ये सुरुवातीपासून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. ज्योती पुंबरे या आघाडीवर होत्या तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रेमलता पारवे या दोन नंबरवर होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाममारे या तीन नंबरवर होत्या. मतांची संख्या कमी जास्त होत असल्याने शेवट पर्यंत वाकधूक होती.
पण शेवटच्या काही प्रभांगाची मोजणी राहिली असताना राष्ट्रलादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी मुर्सटी घेत भाजपाच्या उमेदवाराला मागे सोडले. यानंतर मग भाजपाच्या उमेदवाराला लीड तोडता आली नाही. आणि शेवटी अजित पवार यांच्या सोशल इंजिनिअरिंग ने करिष्मा केला आणि. एक सामान्य सिटीझन असलेल्या प्रेमलता पारवे यांचा विजय होऊन त्या बीड़ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.