Accident News : बसच्या धडकेत तरुण ठार file photo
बीड

Accident News : बसच्या धडकेत तरुण ठार

अंबाजोगाईजवळील घटना; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावरील लोखंडी सावरगाव जवळ रविवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला. अंबाजोगाईकडे येणाऱ्या एका भरधाव शिवाई बस आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत २३ वर्षीय तरुणाचा - जागीच मृत्यू झाला. अथर्व महादेव ढगे (रा. धानोरा खुर्द, ता. अंबाज-ोगाई) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व ढगे हा आपल्या दुचाकीवरून धानोरा (खुर्द) गावाहून अंबाजोगाईच्या दिशेने जात होता. क याच वेळी अंबाजोगाईहुन छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस समोरून येत होती. लोखंडी सावरगाव जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात 5 असताना अथर्वच्या मोटारसायकलची बसला समोरासमोर भीषण धडक बसली.

कहा अपघात इतका भयानक होता की, - यामध्ये मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडक बसल्यानंतर गंभीर मार लागल्याने अथर्वचा जागीच मृत्यू झाला. लोखंडी सावरगाव परिसरात झालेल्या या अपघातामुळे रस्ते सुर क्षेचा आणि वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

तीन महिन्यांपूर्वीच सुरू केला होता नवा व्यवसाय

अथर्व हा एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असून आपल्या आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याला एक विवाहित बहीण आहे. यापूर्वी त्याने अंबाजोगाई येथील एका ट्रॅक्टर शोरूममध्ये काम केले होते. मुलाने स्वतःचा व्यवसाय करावा या उद्देशाने आई-वडिलांनी तीन महिन्यांपूर्वीच त्याला एक किराणा दुकान टाकून दिले होते. या दुकानाच्या माध्यमातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, काळाने त्याच्यावर घाला घातल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT