केज : नातेवाईकांना मेहंदी काढण्यासाठी जात असलेल्या विवाहितेला तिच्या चुलत दिराने रस्त्यात अडवून विनयभंग केला. तसेच तिला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.१९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील २४ वर्षीय विवाहित महिला ही शनिवारी (दि.१९) सायंकाळी सातच्या सुमारास तिच्या गावातील नातेवाईकांच्या घरी मेहंदी काढण्यासाठी जात होते. यादरम्यान नात्याने चुलत दीर असलेल्या तरूणाने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. यावेळी झटापटीत तिच्या हातातील बांगड्या फुटल्या. नंतर त्याने तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तिने आरडाओरड करताच तिचा नवरा तेथे आला. त्यानंतर त्या तरूणाने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात नराधम दिराच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.