बीड

बीड : परळीत जोरदार पाऊस; वीज कोसळून म्हशीचा मृत्यू

दिनेश चोरगे

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्याला आज (दि.११) अवकाळी पावसाने झोडपून काढले असून परळी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. परळी तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज कोसळून एक म्हैस दगावल्याची घटना घडली आहे.

परळी तालुक्यात बुधवार (दि.१०) पासून वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. आज (दि.११) झालेल्या जोरदार पावसात वीज कोसळून खामगाव येथील शरद प्रल्हाद बडे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. परिसरातील काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून काही घरांचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांना नुकसानीचा फटका बसला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT