रावेर तालुक्यात 6 लाखांची गांजाची झाडे जप्त, संशयिताला अटक

रावेर तालुक्यात 6 लाखांची गांजाची झाडे जप्त, संशयिताला अटक

जळगाव पुढारी वृत्तसेवा – रावेर तालुक्यातील सहस्त्रलिग गावच्या हद्दीत शेतात गांजाची झाडे लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे 91 किलो 400 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे ज्याची किंमत 6 लाख 21 हजार 520 रूपये आहे. संशयितासह ही झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी रावेर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना (दि. 10) त्यांच्या गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, रावेर तालुक्यातील लालमाती ते सहस्वलोंग गावांचे रोडलगत ता. रावेर, शिवारात असलेल्या शेतात गांज्याच्या झाडाची लागवड करण्यात आहे.

पोलीस अधिक्षक जळगांव डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक, फैजपुर, अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि आशिष अडसुळ, पोउपनि सचिन नवले, ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर मुकेश मंडे, महेश मंगलदास मोगरे,  विकारोद्दीन गयासोद्दीन शेख, प्रमोद सुभाष पाटोल, समाधान कौतीक ठाकुर, सचिन रघुनाथ घुगे, सुकेश शब्बीर तडवी, संभाजी रघुनाथ विजागरे व तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, दोन पंच फोटो ग्राफर, वजन काटेचा मालक या पथकाने रावेर तालुक्यातील सहस्विलिंग येथे जाऊन आरोपी अक्रम कासम तडवी, शहारुख कासम तडवी दोन्ही रा. सहस्वलींग यांच्या मालकिच्या शेतात गांज्याची लागवड केलेली होती ती सर्व झाडे जप्त केली.

जगदीश लिलाधर पाटील यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिसांत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शहारुख कासम तडबी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरिक्षक सचिन नवले हे करीत आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news