मराठवाडा

बीड : युवा शिवसैनिकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

backup backup

गेवराई (बीड); पुढारी वृत्तसेवा : एका युवा शिवसैनिकाचा शेतात काम करत असताना विद्युत तारेचा शॅाक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि. 14 रोजी) दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजपिंपरी ता. गेवराई शिवारात घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय विठ्ठलराव बरगे असे मृत्यू झालेल्या युवा शिवसैनिकाचे नाव आहे.

मयत संजय बरगे हे किराणा असोसिएशनचे अध्यक्ष बाळू बरगे यांचे बंधू होते. बरगे हे मंगळवारी (दि. 14 रोजी) राजपिंप्री शिवारात असलेल्या शेतीच्या कामासाठी गेले होते. ट्रॅक्टरने शेती काम करत असताना, शेतात पडलेल्या एका विद्युत तारेला त्यांचा हात लागल्याने शॅाक बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवारी सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसैनिक म्हणून ओळख असलेले संजय बरगे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT