माजलगाव (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात असणाऱ्या जयमहेश शुगर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाच्या घेतलेल्या नोंदीचे रेकॉर्ड मोगरा शिवारातील पोहनेर रोड वरील उसाच्या फडात सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
माजलगाव तालुक्यातील साखर कारखाने कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देण्याऐवजी गेटकिनचा ऊस आणण्यावर जास्त भर देत आहे. त्यामुळे नोंदी आसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला तोडणी अभावी तुरा येत आसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्ष, शेतकरी संघटना कारखान्याला जाब विचारुन गेटकिन ऊस बंद करण्याची मागणी करत आसताना दि. ५ फेब्रुवारी रोजी पोहनेर रोडवरील मोगरा खंडोबा फाट्यावर एका शेतकऱ्याच्या शेतात ऊस तोडणी सुरु आसताना, मजुरांना ही कागदपत्रे आढळून आली. ही बाब डॉ. संजय नाकलगावकर यांच्या निदर्शनास आली.
कारखान्याच्या ऊस तोडीचे हे मोठ्या प्रमाणातील रेकॉर्ड या ठिकाणी कसे आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क केला आसता, त्यांनी कागदपत्रांची चोरी झाल्याचे सांगितले. मात्र या चोरीची अद्याप कोणतीही फिर्याद दिली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्याचबरोबर कारखान्यावर 24 तास सुरक्षारक्षक असताना ही चोरी झालीच कशी अशीही चर्चा होत आहे.
हेही वाचा
व्हिडिओ पहा – श्रीवल्लीची भन्नाट मराठी व्हर्जन्स ऐकलीत का? | Marathi versions of Srivalli song | Pushpa
https://youtu.be/FEtlxeG0ZyM