मराठवाडा

बीड : जालन्यातील घटनेचा मराठा समाजाकडून निषेध

सोनाली जाधव

बीड, पुढारी वृत्तसेवा :  आक्रोशित झालेल्या मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तिरडी,  मडके अन डफडे वाजवत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढत थेट  चितेश्वर स्मशान भुमित अंतिमसंस्कार करुन शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

जालना येथील अंतरवली सराटा येथे पोलिसांनी  मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीहल्ला केला. याप्रकरणी  गेवराई येथे राज्य शासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आज (दि.4) रोजी सकाळी ११ च्या दरम्यान गावातून तिरडी, मडके अन डफडे वाजवत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा गावातील गल्ली बोळात फिरवून चितेश्वर स्मशान भुमित नेवून या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे अंतिमसंस्कार केले. आणि मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावी अशी मागणीही केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT