मराठवाडा

बीड : बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारची पादचाऱ्यास धडक

backup backup

बीड, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव गाडीने रस्त्याने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिली. अपघात होताच कारचा ड्रायव्हर गुटखा भरलेली कार जागीच सोडून पळून गेला. ही घटना केज धारूर रोडवरिल साने गुरूजी विद्यालयाजवळ रविवारी (दि.२६) सकाळी घडली.

या बाबतची माहिती अशी की, केज-धारूर रोडवरील साने गुरुजी विद्यालयाजवळ एका कारने क्र. (एम एच-१२/ब-३२६२) रस्त्याने पायी चालत असलेल्या काशिनाथ राऊत (वय ४०) यास धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या नंतर अपघातग्रस्त कार ही रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. अपघाता नंतर चालक कार सोडून पळून गेला.

दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस नाईक उमेश आघाव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी शासकीय वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी काशिनाथ राऊत पेंटर यास रुग्णालयात दाखल करत कारची तपासणी केली. या तपासादरम्यान, कारमधून राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूची बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अपघातग्रस्त कारची तपासणी केली. त्या कारमध्ये १ लाख २५ हजार ९७० रु. किंमतीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT