Sushant Singh Rajput Controversy : ‘सुशांत सिंह राजपूतची झाली हत्या’, पोस्टमॉर्टम करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा खुलासा

Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sushant singh rajput controversy : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याचे जीवन संपवले नसून त्याची हत्या झाली आहे, असा खुलासा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीच्या विधानानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला अडीच वर्षे उलटून गेली आहेत. त्याच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. दुसरीकडे कुटुंबीयांनी सुशांतने जीवन संपवले नसून त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. आता या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. सुशांत सिंहच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्याचा दावा करणाऱ्या रुपकुमार शाह या व्यक्तीने त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, सुशांतचे पोस्टमॉर्टम करणारे डॉ. सचिन सोनवणे यांनी रुपकुमार शाह त्यांच्या टीमचा भाग नसल्याचे म्हटले आहे. (Sushant singh rajput controversy)

14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आढळला होता. यापूर्वी मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. या प्रकरणाचा तपास अहवाल अद्याप आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी सुशांतचे वडील केके सिंग यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले होते की, 'माझे मुलगा जीवन संपवू शकत नाही. तो घाबरट नव्हता, तो एक शूर माणूस होता. जीव संपवणे त्याच्या स्वभावात नव्हते. आपण मी त्याला लहानपणापासून पाहत आलो आहे आणि तो किती धाडसी होता हे मला माहीत आहे. त्याने जीवन संपवले यावर कसा काय विश्वास ठेवायचा? आता सुशांतच्या मृत्यू प्रकरणात नवे सरकार आल्याने त्याला न्याय मिळेल अशी आशा आहे. तपास योग्य दिशेने जाईल असे दिसते,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Sushant singh rajput controversy)

मुंबईच्या कूपर हॉस्पिटलचे शवागार सेवक रुपकुमार शाह यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाच मृतदेह मिळाले होते. त्या 5 मृतदेहांपैकी एक व्हीआयपी मृतदेह होता. आम्ही पोस्टमॉर्टम करायला गेलो तेव्हा कळलं की तो सुशांतच होता आणि त्याच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. त्याच्या मानेवरही दोन-तीन खुणा होत्या. पोस्टमॉर्टम रेकॉर्ड करण्याची गरज होती, मात्र उच्च अधिकाऱ्यांनी केवळ मृतदेहाचे फोटो काढण्यास सांगितले. आम्ही आदेशाप्रमाणे पुढची कार्यवाही केली.'

रुपकुमार शाह पुढे म्हणाले की, 'जेव्हा मी पहिल्यांदा सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी लगेच माझ्या वरिष्ठांना सांगितले की, मला वाटते की त्याने जीवन संपवलेले नाही, ही हत्या आहे. आपण नियमानुसार काम करू. मात्र, माझ्या वरिष्ठांनी मला लवकरात लवकर फोटो काढून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात द्या, असे सांगितले. यामुळेच रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आले.'

सुशांतचे वडील केके सिंह यांनी आरोप केला होता की त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती आणि या हत्येत रिया चक्रवर्ती देखील सामील होती. याप्रकरणी तपास यंत्रणांनी रिया चक्रवर्तीची चौकशी केली. सीबीआयसोबतच अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोही या तपासात सहभागी आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे असून अद्यापपर्यंत तपास यंत्रणेने मृत्यूचे कारण उघड केलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news