माहूर पुढारी वृत्तसेवा : शाळकरी मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोघांविरोधात माहूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.१५) पीडित विद्यार्थीनी शाळेकडून घराकडे परत येत असताना दोघा आरोपींनी दुचाकीवरून पाठलाग करत तिचा विनय भंग केला, अशी फिर्याद पीडित मुलीने माहूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांनी आपल्या सहकार्यांसह तातडीने या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करून नांदेड येथील जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा माहूर पोलीस शोध घेत असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि संजय पवार हे करीत आहेत.