Manoj Jarange Patil Pudhari
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2025; मनोज जरांगेंनी किती वेळा उपोषण केले?

Manoj Jarange Patil Latest News:गेल्या दोन वर्षांत जरांगेंनी किती वेळा उपोषण अथवा आंदोलन केले हे जाणून घेऊया...

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Hunger Strike

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा शुक्रवारी सकाळी मुंबईत पोहोचला. सकाळी 10 वाजता आझाद मैदानात जरांगे उपोषणाला बसले. गेल्या दोन वर्षांत जरांगेंनी किती वेळा उपोषण अथवा आंदोलन केले हे जाणून घेऊया...

पहिले उपोषण

29 ऑगस्ट २०२३ - जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले

1 सप्टेंबर - जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दगडफेक आणि लाठीमार

14 सप्टेंबर - जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते पहिलं उपोषण सोडलं.

14 सप्टेंबर - शिंदेंना सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली.

दुसरे उपोषण

25 ऑक्टोबर 2023 - सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळं पुन्हा उपोषण

30 ऑक्टोबर - माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ

02 नोव्हेंबर - जरांगेंचं दुसरं उपोषण मागे, न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत , धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे.

2 जानेवारीची डेडलाईन

तिसरे उपोषण

मुंबईतील वाशी येथे उपोषण

20 जानेवारी 2024 - मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना. अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस  सुरुवात.

26 जानेवारी 2024- वाशी मार्केट मध्ये मराठा मोर्चाची धडक. मुंबईतील वाशी येथे उपोषणाला सुरुवात.

27 जानेवारी 2024: वाशी येथे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले.

सगे सोयरे कायद्याचा मसुदा जरांगेना सुपूर्द

चौथे उपोषण

10 फेब्रुवारी - मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी. सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण

20 फेब्रुवारी - विधान सभेचे विशेष अधिवेशन. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर.

25 फेब्रुवारी - मुंबईतील सागर बंगल्यावर निघालेल्या जरांगेंना रोखलं.

26 फेब्रुवारी -17 व्या दिवशी महिलांच्या हस्ते सरबत पिवून उपोषण सोडले.

पाचवे उपोषण

4 जून पासुन पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात

उपोषणाच्या सहाव्या दिवशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

10 जून रोजी उपोषण सोडण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांची शिष्टाई यशस्वी झाली.

मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ देत उपोषण स्थगित.

सहावे उपोषण

20 जुलै रोजी पाचवे उपोषण सुरु

सरकारने उपोषणाकडे दुर्लक्ष केले. २४ जुलै रोजी

पाचव्या दिवशी अंतरवाली सरातील महिलांच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे पाटील यानी आमरण उपोषण सोडले.

सातवे उपोषण

प्रजासत्ताक दिनापूर्वी २५ जानेवारी 2025 रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरवात.

सगेसोयरे अध्यादेश, सरसकट ओबीसी प्रमाणपत्र या जुन्या मागण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते.

मनोज जरांगे यांचे ३० जानेवारी रोजी सहाव्या दिवशी उपोषण स्थगित.

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ लेखी आश्वासन घेऊन या ठिकाणी आले होते. मनोज जरांगे यांनी 8 मागण्या केल्या होत्या,मुख्यमंत्री 4 मागण्यांबाबत सकारात्मक होते. आमदार सुरेश धसांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित.

आठवे उपोषण

27 ऑगस्ट 2025 : मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना

28 ऑगस्ट : शिवनेरी गडावर दर्शन घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले

29 ऑगस्ट : सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानात हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत उपोषणाला सुरूवात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT