कोल्हापूर

शाळांचा परिसर आजपासून गजबजणार

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या 3 हजार 715 शाळा शाळा मंगळवार (दि. 25) पासून पुन्हा सुरू होणार आहेत. शाळांची घंटा वाजणार असल्याने परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार 15 फेब—ुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता; परंतु पालक, शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर सरकारने निर्णय बदलला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 25 जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. यात शासकीय 9, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 1981, नगरपालिकेच्या 130, खासगी अनुदानित 996, खासगी विनाअनुदानित 599 शाळांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे 6 लाख 76 हजार 261 विद्यार्थी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जाणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला आहे. जिल्हा परिषद सीईओ यांनी शिक्षण व आरोग्य विभागाची ऑनलाईन बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. शिक्षण समितीच्या बैठकीत सोमवारी सभापतींनी शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे लसीकरण 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा

दोन्ही लसीकरण पूर्ण झालेले शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी संख्या असणार आहे. एक दिवस आड विद्यार्थ्यांना बोलविले जाणार आहे. वर्गखोल्यांच्या उपलब्धतेप्रमाणे दोन सत्रात भरविण्यात येणार. कंटेन्मेंट झोनमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद राहणार आहेत. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 10 फेब—ुवारीपर्यंत पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT