छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या निदर्शनात मंत्री राणेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला.  
कोल्हापूर

नारायण राणे महाराष्ट्रातील नवे औरंगजेब : शिवसेना

backup backup

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, क्रूरकर्मा औरंगजेबाने सत्तेसाठी जसा बापाचा वध केला त्याच पद्धतीने बाप असलेल्या ठाकरे कुटुंबावर राणे टीका करत आहेत. त्यांचे हे रूप महाराष्ट्रातील नवा औरंगजेब असून, या औरंगजेबाचे अस्तित्व शिवसैनिक योग्यवेळी मिटवतील, अशी टीका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री राणे यांच्या पुतळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने दहन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या निदर्शनात मंत्री राणे यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला व मंत्री राणेंनी जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत. असा इशाराही देण्यात आला. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "नारायण राणे च करायचं काय खाली डोक वर पाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक राजू हुंबे, किशोर घाटगे, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, उपशहरप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रणजीत जाधव, सुनील खोत, राजू पाटील, सुनील जाधव, विभागप्रमुख सुनील भोसले, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, गजानन भुर्के, टिंकू देशपांडे, युवा सेनेचे अविनाश कामते, योगेश चौगेले, अॅड.चेतन शिंदे, पियुष चव्हाण, राहुल माळी, अक्षय खोत, रणजीत मिनचेकर, रियाज बागवान, निलेश हंकारे, बबन गवळी आदी उपस्थित होते.

हे ही वाचलत का :

श्रावण मासा निमित्त पुण्यातील श्री वृद्धेश्वर -सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT