कोल्हापूर

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक म्हणाले, ही नुरा कुस्ती नव्हती, तर…

सोनाली जाधव

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकांची मागच्या दीड महिन्यापासून रंगत् सुरू आहे. आज मतमोजणीला  शुक्रवारी (दि.७) सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंडलिक म्हणाले, ही नुरा कुस्ती नक्कीच नव्हती लोकांनी लोकांनी जिल्हा बँकेसाठी भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे नुरा कुस्तीचा विषय येत नाही. बिनविरोधपेक्षा लोकांना मतदान करण्याची इच्छा खूप होती. त्यामुळे ९८ टक्के मतदान झाले. शिवसेना अत्यंत ताकदीने लढली. आमच्याकडे साधनसामुग्री नसतानाही आम्हाला जनाधार मिळाल्यानेच आम्ही विजयी झालो.

ते पुढे म्हणाले- सत्ताधाऱ्यांमधील दोन जागा आमच्याच असतील. वेट अँड वॉच असेही मंडलिक म्हणाले.

मंडलिक म्हणाले- मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि शाहूवाडीचे रणवीर गायकवाड हे आमचेच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत शिवसेनेच्या जागा वाढणार आहेत.

मतदारांनी दिलेला कौल मान्य…

सकाळी नऊ वाजता खासदार संजय मंडलिक यांनी रमणमळा येथील मतमोजणी केंद्राला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदार जिल्हा बँकेत कोणाला निवडून द्यायचे त्यांनी ठरवलं होतं. जिल्हा बँक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.

जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्कंठा सर्वच घटकांना लागून राहिली आहे.  मतदान केंद्रावर मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत त्यामूळे चर्चेला उधान आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT