कोल्हापूर

कोल्‍हापूर : धामोड येथे मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारातून संताप व्यक्त

अविनाश सुतार

धामोड; पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान चुरशीने सुरु आहे. मात्र दुपारी बारापर्यंत प्रभागातील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे मतदारांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

धामोड येथे पाच प्रभाग असून, मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक चारमधील मतदान यंत्रे बंद पडली होती; पण निवडणूक विभागाने तात्काळ मशीन बदलली. येथील अतिसंवेदनशिल असलेल्या प्रभाग क्रमांक पाचमधील मतदान यंत्र बंद पडल्यानंतर रांगेत उभा असलेल्या मतदारांनी व दोन्ही गटाच्या उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त केला.

येथील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मतदान यंत्रातील दोषांमुळे मतदारांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. दरम्यान, धामोडमधील पाचही प्रभागात मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT