Vivekanand Patil Speech Gokul Sangharsh Morcha: गोकुळच्या संत्तासंघर्षात सरकारचा थेट हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत समविचारी आघाडीने आज कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या व्यासपीठावर विवेकानंद पाटील या एमपीएसी आंदोलनात फेमस झालेल्या तरूण वक्त्याने देखील आपल्या खास शैलीत भाषण केलं. यावेळी त्याने गोकुळवर आम्हाला चोरमन नको चेअरमन हवा आहे असं ठणकावून सांगितलं.
संघर्ष मोर्चाचे नेते सतेज पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर पोहचल्यानंतर विवेकानंद पाटील यांनी सर्वात आधी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी गोकुळच्या नावानं मंत्रालयात बसलेल्या कंस मामा बोटं मोडत आहे असं म्हणत गोकुळच्या बाहेरच्या हस्तक्षेपावर टीका केली.
यावेळी विवेकानंद पाटील यांनी उद्या गोकुळचा चेअरमन निवडायचा आहे. समविचारी आघाडीनं शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमन करण्याचा निर्धार केला आहे. मात्र महायुतीकडून वेगळा रडीचा डाव खेळला जात आहे. असं म्हणत शशिकांत पाटील चुयेकर हे चेअरमन आहेत तर तज्ज्ञ संचालकांच्या माध्यमातून निवडला जाणारा चेअरमन हा चेअरमन नसून चोरमन आहे अशी देखील टिका केली.
गोकुळमधील राजकारणाानंतर राजकीय भूमिकेबदद्ल देखील विवेकानंद पाटील यांनी भाष्य केलं. विवेकानंद पाटील यांनी मी रोहित पवार यांच्या सोबत होतो त्यावेळी मला रोहित पवार यांचा माणूस म्हणाले, मी शेतकरी संघटनेच्या मोर्चात होतो. मला राजू शेट्टींचा माणूस म्हणाले, मी बाळासाहेबांसोबत होतो तर मला सांगलीचा माणूस म्हणाले, आता मी बंटी पाटील साहेबांसोबत आहे तर मी काँग्रेसचा माणूस आहे असं म्हणतील. मात्र मी कोणत्याही पक्षात नाही.
विवेकानंद पाटील यांनी राजकारण करायचं नाही असं म्हणत असतानाच भाजपचे विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हान देऊन टाकलं. त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून फॉर्म भरावा मी अपक्ष म्हणून फॉर्म भरतो असं आव्हान दिलं.
कोल्हापुरातील समविचारी संघर्ष मोर्चावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील भाषण केलं. त्यावेळी त्यांनी स्विकृत संचालकांची संकल्पना कशासाठी आणली गेली हे सांगत त्यांना कधीही मतदानाचा अधिकार देण्यात आला नव्हता असं सांगितलं.