शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : नागांव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीवर सत्तांतर होवून महाडीक गटाला धक्का देत काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील व जनसुराज्यचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या संयुक्त विकास आघाडी व पाटील पॅनेलची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली. सरपंचासह १२ तर महाडीक गटाच्या ५ जागांवर विजयी झाला. सरपंचपदी विमल अनिल शिंदे या निवडून आल्या तर राजेंद्र यादव यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.
नागांव ग्रामपंचायतीवर गेली दहा वर्षे महाडीक गटाची सत्ता काय होती पण महाडीक गटातील अंतर्गत वादामुळे महाडीक गटाला खिंडार पडल्यामुळे गावातील नेते पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांच्यासोबत गेले. गावच्या अनेक विकास कामांचे प्रश्न सोडवण्यासाठी दहा वर्षे सत्तेबाहेर असणाऱ्या विनय कोरे गटाचे व पाटील पॅनेलचे नेते सुभाष पाटील यानासोबत घेवून संयुक्त विकास आघाडी करत त्यानी गावातील ६ वॉर्डातील सर्व जागांवर १७ + १ उमेदवार उभे केले. यामध्ये सत्ताधारी महाडीक गटाच्या ५ व सतेज पाटील व विनय कोरे गटाच्या 12 + १ असे उमेदवार निवडून आले.
ग्रामपंचायत सरपंच हे अनुचित जाती महिला आरक्षण असल्याने संयुक्त विकास आघाडी व पाटील पॅनेलच्या सरपंच उमेदवार सौ. विमल अनिल शिंदे तर विरोधी विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. सोनाली विद्याधर कांबळे यांच्यात सरळ लढत होती. यामध्ये सौ. विमल अनिल शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने त्यानी सौ. कांबळे यांना पराभूत केले.
तर विकास आघाडीचे नेते व महाडीक गटाचे कट्टर कार्यकर्ते विजय पाटील यांची पत्नी सौ. अश्विनी विजय पाटील, सुलोचना कांबळे, राजेंद्र यादव हे वार्ड क्रमांक १ मधून विजयी झाले. तर वार्ड क्रमांक २ मध्ये कुमार राठोड, मनिषा पाथरे, सागर गुडाळे, वार्ड क्रमांक ३ मध्ये अजित घाटगे, संगीता वायदंडे, वार्ड क्रमांक ४ श्रेयश नागांवकर, मंगल चव्हाण, संगीता कोळी, वार्ड क्रमांक ५ अभिनंदन सोळांकुरे, शुभांगी पवार, आश्विनी माळी, वार्ड क्रमांक ६ अक्षय कांबळे , मोसमी कांबळे, सुधिर पाटील हे सर्व उमेदवार विजयी झाले.
राजेंद्र यादव यांची हॅटट्रिक
या निवडणुकीत काहींची विजयी हॅटट्रिक झाली तर जनतेच्या कौलामुळे अनेकाना हॅटट्रिक होण्यापासून रोखले. यामध्ये राजेंद्र यादव यांनी विजयी हॅटट्रिक केली. यादव यानी दोन टर्म ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविले आहे. तर माजी उपसरपंच अनिल कांबळे यांचा पराभव झाला.
हेही वाचलंत का?