रायगड : रोहा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांचा करिष्मा कायम | पुढारी

रायगड : रोहा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांचा करिष्मा कायम

रोहे; पुढारी वृत्तसेवा : रोहा तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सारेच पक्ष होते. परंतु, रोहा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाने आपला बालेकिल्ला साबूत ठेवत पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. रोहा तालुक्यात पुन्हा एकदा खा. सुनील तटकरे यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले.

रोहा तालुक्यात दापोली, खैरे खुर्द, पुई, पहूर, तळवली तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी सकाळी ११ वाजता सुरू होऊन सव्वा बाराच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. या ५ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचे थेट सरपंच निवडून आले आहेत. या पाचही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षांनी आपला वर्चस्व कायम ठेवला आहे.

पुई ग्रामपंचायत

रोहा तालुक्यात झालेल्या पाच ग्रामपंचायती निवडणूकीमध्ये पुई ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी राष्ट्रवादी पक्षाच्या वृषाली संजय मांडलूसकर या ४६३ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या ग्राम विकास आघाडीच्या उमेदवार अस्मिता अनंत सानप यांना ४०४ मते मिळाली आहेत.

या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये पुजा शरद दिसले मते १८८ राष्ट्रवादी विजयी, नामदेव कृष्णा आंबेकर मते १६८ ग्रा. वि. आ. पराभूत, सारिका ज्ञानेश्वर खामकर मते १९८ ग्रा. वि. आ. विजयी, सीमा सिद्धार्थ गायकवाड मते १६६ पराभूत राष्ट्रवादी, दिव्या देविदास चितळकर मते १५९ ग्रा. वि. आ. पराभूत, सरिता प्रवीण धामणसे मते १८४ विजयी राष्ट्रवादी, संगीता रमेश जाधव मते १७२ विजय राष्ट्रवादी, शकुंतला आत्माराम वाघमारे मते ६८ पराभूत ग्रा. वि. आ., ऋषिकेश चंद्रकांत दळवी मते १६७ विजयी राष्ट्रवादी, अबिद मेहबूब सय्यद मते ७३ पराभूत ग्रा. वि. आ., प्रतीक्षा हरिश्चंद्र कदम मते १६८ विजयी ग्रा. वि. आ., गीता गणेश देवळेकर मते ९८ पराभूत राष्ट्रवादी, अजित लक्ष्मण लहाने मते १७८ विजय ग्रा.वि.आ., प्रसाद गजानन गायकवाड मते ८२ पराभूत राष्ट्रवादी असे उमेदवार आहेत.

खैरै (खुर्द) ग्रामपंचायत

खैरे (खुर्द) ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच पदासाठी मुजम्मिल अहमद गीते हे ६५३ मते घेऊन विजयी झाले आहे. तर त्यांच्या विरोधात असलेले काशिनाथ खंडू भोईर ४३३ मते तर अनिल काशिनाथ साळगावकर यांना ३१५ मते मिळाली आहेत.

खैरे खुर्द ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये जुबेर अकबर धनसे मते २७९ विजयी, जहुर अ. रज्जाक खोत मते ५८ पराभूत, शैला अंकुश वाघमारे बिनविरोध, रीना तुषार कोंडे बिनविरोध, रेश्मा रवींद्र गायकवाड मते ३२१ विजयी, फातिमा मुजम्मल गीते मते २१० पराभूत, नरेश जानू देवळे बिनविरोध, भगवान वेटू यादव बिनविरोध, नर्गिस मुबीन बडे मते ३५९ विजयी, अमिष्का अमित साळगावकर मते ३५१ विजयी, संगीता अरुण कोंडे मते २८४ पराभूत, रुपेश हरिश्चंद्र साळुंखे मते ३२३ विजयी, अंकुश काशिनाथ वाघमारे मते १९२ पराभूत असी उमेदवारांची नावे आहेत.

तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायत

तळवली तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकला असून या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदासाठीचे उमेदवार रवींद्र रामचंद्र मरवडे ६५१ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार सुधीर नारायण लोखंडे यांना ४०४ मते पडले आहेत.

ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये अनघा अभिजीत खांडेकर मते ३६८ विजयी, सुकेशिनी ठमाजी महाडिक मते २९७ विजयी, संपदा गजानन महाडिक मते २४३ पराभूत, संदीप दत्तात्रेय महाडिक बिनविरोध, तारामती हरिश्चंद्र पवार मते १४० विजयी, सुनिता नवनाथ वालेकर मते ९४ पराभूत, दयाराम मोरेश्वर मरवडे मते १२३ विजयी, अरविंद सहादेव भिलारे मते ११५ पराभूत, हरिश्चंद्र परशुराम मांगुळकर मते १६९ विजयी, गणेश वामन नागावकर मते १४८ पराभूत, नीलम अमित वाळुंज मते १७५ विजयी, कल्पना केशव मरवडे मते १४२ पराभूत अशी नावे आहेत.

पहुर ग्रामपंचायत

पहूर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या दिपाली दिलीप खांडेकर या ५१६ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधातील अश्विनी प्रदीप तांदळेकर यांना १२९ मते तर अमृता रमेश धनवडे यांना २९५ मते पडले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये खरी लढत राष्ट्रवादी विरोधात शिंदे गट अशी होती.

पहूर ग्रामपंचायततील सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये निकिता विनेश जाधव मते १९१ विजयी राष्ट्रवादी, भारती अशोक वाळंज मते १६८ विजयी राष्ट्रवादी, सुरेखा गोविंद जाधव मते ६० पराभूत, सविता संतोष दळवी मते ९६ पराभूत, ऐश्वर्या यशवंत शिंदे मते २६ पराभूत, अनंत श्रीधर वाळंज मते १९७ विजयी राष्ट्रवादी, संतोष भागुराम गायकवाड मते ७५ पराभूत, राजीव बाळकृष्ण शिंदे मते १५७ विजयी शिंदे गट, रोहिदास शहाजीराव मोरे मते १४५ पराभूत, सुनंदा काशीराम मांडवकर मते १४४ विजयी राष्ट्रवादी, अर्पिता अनंत शिंदे मते ११० पराभूत, अरुणा अंकुश शिंदे मते ५० पराभूत, अलका शरद पवार बिनविरोध राष्ट्रवादी, तेजस ताराचंद काळोखे बिनविरोध राष्ट्रवादी अशी नावे आहेत.

दापोली ग्रामपंचायत

शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या दापोली ग्रामपंचायतीत यावेळी राष्ट्रवादी पक्षाने खेचून आणली आहे. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाळाराम रामा मोरे हे ४६८ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्याच्या विरोधातील शेकापचे उमेदवार अविनाश रघुनाथ पाटील यांना ३४७ मते पडले आहेत.

दापोली ग्रामपंचायतच्या सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये वैशाली काशिनाथ पाटील मते १५८ विजय राष्ट्रवादी, हर्षला हरिश्चंद्र पाटील मते १६६ विजय राष्ट्रवादी, गिरीश लक्ष्मण ठाकूर मते १८२ विजय राष्ट्रवादी, ज्योत्स्ना जगन्नाथ ठाकूर मते १५२ पराभूत, निर्मला बाळाराम पाटील मते १४३ पराभूत, राकेश राजाराम पाटील मते १२७ पराभूत, अशा मोहन सरनेकर मते ९८ विजयी शेकाप, जयश्री विलास मालुसरे मते ९० पराभूत, हरेश चंद्रकांत म्हात्रे मते ९६ विजयी शेकाप, मंगेश लखमा खोत मते ८९ पराभूत, ज्योत्स्ना गजानन घरत मते २२६ विजयी राष्ट्रवादी, मंजुळा राजेंद्र ठाकूर मते ८९ पराभूत, किसन काशिनाथ मोरे मते १९९ विजय राष्ट्रवादी, प्रियांशू दीपक घरत मते ११७ पराभूत असे मते आहेत.

खा. सुनील तटकरे, माजीमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने लढविण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने झालेल्या विकास कामांचा हा विजय असून भविष्यातही सुनील तटकरे, माजीमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकास होणार असल्याचे सांगितले आहे.
– मधुकर पाटील ( अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा)

Back to top button