नांदेड : कारकाळा ग्रामपंचायतीवर गोरठेकर गटाचे तीन तर कवळे गटाचे चार उमेदवार विजयी! | पुढारी

नांदेड : कारकाळा ग्रामपंचायतीवर गोरठेकर गटाचे तीन तर कवळे गटाचे चार उमेदवार विजयी!

उमरी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एकमेव कारकाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (दि.१८) रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण ४६७ मतदारांपैकी ४०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण तीन वार्डातील सात उमेदवारांपैकी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत माजी.आ.कै.बापूसाहेब देशमुख यांचे समर्थक यांच्या भैरव विकास गटाचे तीन तर, काँग्रेस प्रणीत मारोतराव कवळे गटाचे चार उमेदवार विजयी झाले. तर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या, शिवकांता मल्लु कमळे यांनी कवळे गटाच्या अंजली संतोष गुंठे यांचा २२०-१८६ असा पराभव केला.

 विजयी उमेदवार याप्रमाणे

प्रभाग.क्र. १ शिवकांता मल्लु कमळे – (२२० सरपंच विजयी ),अंजली संतोष गुंठे (१८६ पराभूत) प्रभाग.क्र. २ कदम श्रीनिवास गणेशराव (८४ विजयी), कदम मारोती सखाराम (८० पराभूत), कदम आशाताई उत्तमराव (८३) कदम गोदावरी संभाजी (८३) या दोघींना समान मतदान मिळाल्याने तीन वर्षीय बालिका कु.आरुषी दीपक ढवळे हिच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये कदम गोदावरीबाई संभाजी यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.गंगुबाई पांडुरंग कमळे (७४), मोटरगे रंजनाबाई माधवराव (८७ विजयी). प्रभाग.क्र.२ दिगंबर विट्ठल अंदेवाड (९० विजयी ) दासरवाड विजय सायबु (४३ पराभूत), बोगाळे शांताबाई माधव (८९ विजयी), कमळे गंगुबाई खंडू (४२ पराभूत) प्रभाग.क्र.३ कदम गोविंदराव बापूराव (५८ विजयी ),कदम साहेबराव मारोती (४९ पराभूत), अंदेवाड धुर्पतबाई भिमराव (५४ विजयी), महीफळे धुर्पतबाई प्रकाश (५३ पराभूत ) झाल्या.

या मतमोजणी दरम्यान तहसीलदार माधव बोथीकर, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तमराव मुंडकर,डी.टी.खूपसे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर याची भेट घेतली.यावेळी त्यांनी तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या शिवकांता मल्लू कमळे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भाऊसाहेब देशमुख,सुभाषराव देशमुख आदींनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले.यावेळीफटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचलंत का?

Back to top button