Girl Kidnapped Case  Pudhari
कोल्हापूर

Minor Girl kidnapping case | चंदगडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण नाट्य, अज्ञाताचा माघ काढण्यासाठी पोलिसांचा पाठलाग

Minor Girl kidnapping case | चंदगडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण नाट्य, अज्ञाताचा माघ काढण्यासाठी पोलिसांचा पाठलाग

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : वेंगुर्ला-बेळगाव या राज्य मार्गावर शिनोळी खुर्द येथे बुधवारी (दि. १६) सायंकाळी ८ वाजता एका आठ वर्षे बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. अज्ञाताने आठ वर्षाच्या या मुलीला एक तासभर अज्ञातवासात नेले होते. घटनास्थळी चंदगडचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गडहिंग्लज उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक विवेक पाटील ही घटनास्थळी दाखल होत तपास गतीने सुरू आहे. पलक हरिकेष पासवान (वय ८, मुळ गाव - बिहार, सध्या रा. शिनोळी खुर्द, औद्योगिक वसाहत, ता. चंदगड ) असे अपहरण करून पुन्हा एक तासाने सोडलेल्या मुलीचे नाव आहे.

औद्योगिक वसाहत मधील गणेश मंदिराजवळ कंपनीकडून घरी परतणाऱ्या दोन भावंडांपैकी आठ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून अज्ञाताने दुचाकीवर बसवून नेले होते. पुन्हा एक तासानंतर त्या मुलीला शिनोळी येथेच आणून सोडले. ही मुलगी सुखरूप असून ती घाबरल्यामुळे पुरेशी माहिती सांगत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील वर्षभरात तिसऱ्यांदा अशी घटना घडल्याने चंदगड तालुक्यासह सीमाभागात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. त्या मुलीला अज्ञाताने सुर्या हॉटेल शेजारी सोडून चंदगडच्या दिशेने पोबारा केला. पोलिसांनी तुर्केवाडी पर्यंत पाठलाग केला. पण काळा शर्ट, काळी पँट, हेल्मेट घातलेला अज्ञात पोलिसांच्या हाती सापडला नाही.

सरपंच गणपत कांबळे, उपसरंपच पुंडलिक गवसेकर यांनी लागलीच ही माहिती चंदगड पोलिसांना दिली. यानंतर हालचाली गतिमान झाल्या. पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील ही रात्री बारा वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल होते. अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी चंदगड पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा उपस्थित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT